शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

महामूर्तीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

By admin | Updated: February 5, 2015 00:13 IST

महामस्तकाभिषेकाची सांगता : णमोकार मंत्र व बाहुबली भगवानांचा एकच जयजयकार

बाहुबली : येथील १००८ भगवान बाहुबली सुवर्णमहोत्सवी महामस्तकाभिषेकप्रसंगी भगवान बाहुबली महामूर्तीवर व पहाडावरील त्रिकूट मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी चोहोबाजूंनी णमोकार मंत्र व बाहुबली भगवानांच्या जयजयकाराचा एकच जल्लोष झाला; तर सायंकाळी भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव व मंगल महाआरतीने महामस्तकाभिषेकाची सांगता झाली.भगवान बाहुबली महामूर्ती महामस्तकाभिषेकाच्या तिसऱ्या दिवशी महामूर्तीच्या चरणाभिषेकचा मान अशोक कल्लाप्पा कोंडे, सुरेखा कोंडे यांना मिळाला. पूजा-विधान मंडपाचे ध्वजारोहण श्रीपाल कटारिया (जयपूर) यांनी केले. विधान मंडपाचे उद्घाटन सुदीन खोत (पुणे) यांनी केले. मंगल कलशस्थापना सनतकुमार आरवाडे (सांगली) यांच्या हस्ते झाली. दीपप्रज्वलन गुरुकुलचे स्नातक आप्पासाहेब भगाटे यांनी केले.३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी अखेर सुरू असलेल्या महोत्सवामध्ये दि. २, ३ व ४ फेब्रुवारी या दिवशी महामूर्तीचा मस्तकाभिषेक करण्यात आला. यावेळी जलाभिषेकाचा मान वीरेंद्र दिलीप पंचवाटकर, अष्टगंधाभिषेक : सुरेश पाटील (सांगली), दुग्धाभिषेक : अण्णासाहेब शेंडुरे (हुपरी), कुंकुमाभिषेक : महावीर हिरालाल दोशी, दही अभिषेक : तात्या अथणे, पीतकुंभाभिषेक : चंद्रशेखर समाने, सर्वोवषधी अभिषेक : महावीर पाटील यांच्यासह हजारो भाविकांनी मस्तकाभिषेक केला.पंचपरमेष्ठी कलश, रत्नत्रय कलश, रत्नकलश, अमृतकलश, सुवर्णकलश, रजतकलश व पद्मकलशांनी मानकऱ्यांनी मस्तकाभिषेक केले. याप्रसंगी लाखो भाविक मंदिर परिसर, शाळेची इमारत, डोंगरावरील गुरुकुलच्या छतावर, झाडावर बसून अभिषेक पाहात होते. महामूर्तीवर व पहाडावरील त्रिकूट मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली, तर सायंकाळी वीरसेवा दलाचे झांजपथक, बॅन्ड व णमोकार मंत्राच्या जयजयकारात भव्य रथोत्सव काढण्यात आला. रथात बसण्याचा मान अभिषेक दादासोा पाटील यांना मिळाला. तर रात्री मंदिर परिसरामध्ये हजारो श्रावक-श्राविकांच्या उपस्थितीत सामुदायिक मंगलआरती करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर लक्ष दिव्यांनी उजळून गेला. संपूर्ण पूजा विधी-विधान पू. १०८ वर्धमान सागर महाराज, श्रीभद्र महाराज, आर्यिका ज्ञानमती माताजी, आर्यिका लक्ष्मीमनी माताजी व क्षुल्लक समर्पणसागर महाराजांच्या उपस्थितीत होत आहे. तर विधी-विधान क्रिया सुशीलकुमार उपाध्ये, महावीर शास्त्री, पं. सम्मेद उपाध्ये यांनी केली. (वार्ताहर)परिसरात भक्तीमय वातावरणकुंभोज : बाहुबली (ता. हातकणंगले) येथील महामस्तकाभिषेक सोहळ््याच्या निमित्ताने कुंभोज पंचक्रोशीतील जैन बांधवांत चैतन्य पसरले आहे. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या डोळ््याचे पारणे फेडणाऱ्या भक्तीमय सोहळ््यात महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील लाखो भाविक पवित्र वातावरणात न्हाऊन निघत आहेत.दर बारा वर्षांनी होणाऱ्या महामस्तकाभिषेक सोहळ््याचे नेटके संयोजन, दर्जेदार सुविधा, भक्तीमय तसेच देखण्या परिसरानेयुक्त करणेत आलेल्या वातावरण निर्मितीने इथे दखल होणारा प्रत्येक भाविक भक्तीमय वातावरणात रमून जात आहे.केवळ जैन धर्मीयच नव्हेत, तर जैनेतर समाजातील अबालवृद्धांची सोहळ््यातील उपस्थिती लक्षणीय आहे. रोज विविध विषयांवरील प्रबोधनपर व्याख्याने, सवालधारकांची मिरवणूक, विविध धार्मिक विधी, भोजन, सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात रमलेले हजारो भाविक प्रसन्न झाले आहेत. कुंभोज, नरंदे, हिंगणगाव, दानोळी, मजले, आळते या पंचक्रोशीतील जैन बांधवांच्या घरी सोहळ््यादरम्यान नातेवाईक तसेच हातकणंगले ते बाहुबली तसेच बाहुबली ते कुंभोज, पेठवडगाव मार्गावर वाहनांची रीघ लागली. मुले शाळेतून सवलत घेऊन पालकांसोबत गेले पाच दिवस बाहुबलीच्याच वाटेवर आहेत. (वार्ताहर)रवींद्र जैन यांना समाजभूषणमहामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध संगीतकार व गीतकार रवींद्र जैन यांनी धार्मिक गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या महोत्सव समारंभाचे औचित्य साधून जैन यांना महामस्तकाभिषेक समिती व बाहुबली संस्थेमार्फत ‘समाजभूषण’ हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमास क्षुल्लक समर्पणसागर महाराज, राजू शेट्टी, अरविंद दोशी, सनतकुमार आरवाडे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, कार्याध्यक्ष डी. सी. पाटील, सहकार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील, विजय बेळंकी, प्रकाश आवाडे, उत्तम आवाडे, बी. टी. बेडगे, डी. ए. पाटील, कलगोंडा पाटील, अनिल भोकरे, वीर सेवा दल, वीर महिला मंडळाचे कार्यकर्ते, महोत्सव समितीचे पदाधिकारी, स्नातक, अध्यापक उपस्थित होते.