शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्याचा कारभार चालतो भाड्याच्या जागेत

By admin | Updated: March 31, 2015 00:27 IST

या इमारतीच्या शेजारी वनविभाग परिक्षेत्र हे कार्यालयदेखील ऐतिहासिक इमारतीमध्ये आहे. या कार्यालयाच्या मोजक्याच दोन-तीन खोल्या

किरण मस्कर - कोतोली--पन्हाळगडावर चालणारा प्रशासनाचा कारभार हा शासकीय कार्यालयांना पुरेशी जागा नसल्यामुळे व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा-सुविधा वेळेत मिळत नसल्याने भाड्याच्या जागेत चालत आहे.गडावर असणाऱ्या ऐतिहासिक इमारतीच्या जागेत तहसील कार्यालय आहे, पण कार्यालयांतर्गत येणाऱ्या अन्य विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी अथवा नागरिकांना बसण्यासाठी पुरेशी अशी जागा नाही. या इमारतीमध्ये पोलीस गार्डरूम व पोलीस ठाण्याचा तुरुंग विभाग, त्यात पोलिसांचे शस्त्रागार विभाग व उपकोषागार कार्यालय एकाच इमारतीमध्ये आहे, पण शासनाचा खजिना, पोलीस ठाण्यातील आरोपी व शस्त्रे ही याच इमारतीमध्ये दिसतात. या कार्यालयात स्वमालकीचे स्वच्छतागृहही नाही. नगरपालिकेच्या स्वच्छतागृहाचा वापर येथील कर्मचारी व कामासाठी येणाऱ्या नागरिकांना करावा लागत आहे. या इमारतीच्या शेजारी वनविभाग परिक्षेत्र हे कार्यालयदेखील ऐतिहासिक इमारतीमध्ये आहे. या कार्यालयाच्या मोजक्याच दोन-तीन खोल्या असून कर्मचारी अथवा इतर नागरिकांना बसण्यास पुरेशी जागा नाही, तर नगरपालिकेच्या सभागृहात प्रांत कार्यालय, भूमिअभिलेख, तसेच तालुका कृषी कार्यालयही एका खासगी इमारतीच्या तळघरात भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहे. या सर्वांमध्ये पन्हाळा पंचायत समितीची इमारत मात्र स्व:मालकीची असून, सर्व सोयीसुविधा याठिकाणी आहेत. पन्हाळ्यात प्रांत कार्यालय, तहसील कचेरी, वन विभाग परिक्षेत्र, पोलीस ठाणे, बिनतारी संदेश विभागीय कार्यालय, उपकोषागार कार्यालय, न्यायालय, कृषी विभाग, सहा. निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालय, तालुका पुरवठा अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, पोस्ट आॅफिस, भूमी अधीक्षक, पुरातत्त्व अधीक्षक, पंचायत समिती कार्यालय, अशी कार्यालये आहेत, तर यातील काही कार्यालये खासगी भाड्याच्या जागेत तसेच काही कार्यालये पन्हाळा नगरपालिकेच्या इमारतीमध्ये भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत. अनेक वर्षांपासून या सर्वांची एकच मध्यवर्ती इमारत होणार आहे, अशी चर्चा सुरू आहे, पण या प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयासाठी अद्याप तरी मुहूर्त सापडलेला नाही.