शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

महापुरात बुडालेल्या गल्ल्या पुन्हा गजबजल्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:24 IST

कोल्हापूर : शंभर टक्के महापुरात बुडालेली आंबेवाडी, चिखली पंचगंगेचे पाणी ओसरू लागल्यानंतर वेगाने पूर्वपदावर येऊ लागली आहे. ग्रामस्थ महापुराच्या ...

कोल्हापूर : शंभर टक्के महापुरात बुडालेली आंबेवाडी, चिखली पंचगंगेचे पाणी ओसरू लागल्यानंतर वेगाने पूर्वपदावर येऊ लागली आहे. ग्रामस्थ महापुराच्या खाणाखुणा अंगाखांद्यावर खेळवतच मोडलेला संसार पुन्हा एकदा उभा करण्यात गुंतले आहेत. स्वच्छतेची कामे युध्दपातळीवर सुरू असून घर, अंगण, रस्तेही वेगाने गाळमुक्त होत आहेत. आता घरी परतलेल्या ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली आहे ती मदतीची आणि पंचनामे सुरू होण्याची.

२०१९ ला अनपेक्षितपणे आलेल्या महापुराने पंचगंगा नदीला खेटून असलेल्या करवीर तालुक्यातील आंबेवाडी आणि चिखली ग्रामस्थांची दाणादाण उडवली. एका क्षणात होत्याचे नव्हते केले. यावर्षीदेखील त्याची पुनरावृत्ती होईल, अशी शंका होती, पण महापुराचे पाणी दीड फुटाने जास्त आले तरीदेखील २०१९ ची भयावहता मात्र दिसली नाही, हे विशेष. लोक सावध झाले, पुराची कमाल रेषेची आधीच कल्पना असल्याने बऱ्यापैकी हानी टाळता आली, पण जे बेसावध राहिले किंवा काही सोयच नव्हती, पाणी वेगाने वाढल्याने बाहेर पडायला वेळ मिळाला नाही, अशांचे प्रापंचिक साहित्यासह इतर नुकसानही मोठ्याप्रमाणावर झाले आहे. आता पूर ओसरल्यानंतर घरी आल्यावर हे नुकसान झालेले असतानाही पुन्हा नव्या उमेदीने ग्रामस्थ कामात गुंतले आहेत.

स्वयंसेवी संस्थांकडून स्वच्छता

आंबेवाडी आणि चिखलीत फिरताना जागोजागी अजूनही कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. जगदगुरू मठ व नानीज संस्थानच्या ५०० महिला-पुरुषांचा समावेश असलेला समन्वयकांचा गट या दोन गावांत कचरा उचलून गाव स्वच्छ करण्याच्या कामात गुंतला आहे. अमित लाड त्यांचे नेतृत्व करत आहेत.

सरनाईक बंधूंचे संगीत पाण्यात

चिखलीमध्ये कच्च्या दगड-मातीच्या घरांची पडझड झाली आहे. यात कृष्णात व विष्णू सरनाईक यांच्या दुमजली घराचा ढिगारा झाला आहे. ते स्टार ऑर्केस्ट्रा चालवत होते. पूर येणार म्हणून सर्व सामान माडीवर ठेवले आणि जनावरांसह घर सोडले. महापुरात हे घर पूर्णपणे कोसळले. प्रापंचिक साहित्य, धान्य, वाहने ढिगाऱ्याखाली अडकली, पण तब्बल १० लाखांचे साहित्य पाण्यात बुडाल्याने सरनाईक बंधूंवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्पीकर देखील वाहून गेले आहेत.

स्वप्नांचा चिखल

आंबेवाडीतील प्रिया पवार यांनी सहा महिन्यांपूर्वी शिलाईचे दुकान सुरू केले. कोरोनामुळे ते तसे चालले नाही, तोपर्यंत आलेल्या पुराने सर्व मशीन चिखलात रुतली आहे. जणू काही त्यांच्या स्वप्नाचाच चिखल झाला आहे, पण तरीदेखील त्या सावरण्यात, स्वच्छतेत गुंतल्या आहेत.

फोटो: २८०७२०२१-कोल- चिखली ०१

फोटो ओळ:

(छाया: नसिर अत्तार )

फोटो: २८०७२०२१-कोल- चिखली ०१, ०२

फोटो ओळ : तब्बल पाच दिवस प्रलंयकारी महापुरात बुडालेले कोल्हापूर जिल्ह्यातील चिखली (ता. करवीर) गाव पूर ओसरेल तसे पूर्वपदावर येऊ लागले. बुधवारी स्वच्छतेसाठी राबणारे हजारो हात आणि त्याला कडकडीत उन्हाच्या रूपाने निसर्गाने दिलेली साथ यामुळे गाव चकाचक झाले आहे.

(छाया: नसिर अत्तार )

फोटो: २८०७२०२१-कोल- आंबेवाडी ०१, ०२

फोटो ओळ : पंचगंगेला लागून असलेले आंबेवाडी गाव महापुराने कचऱ्यात परावर्तीत केले; पण स्वयंसेवी संस्था मदतीला धावून आल्या आणि गाव वेगाने कचरामुक्त होऊ लागले आहे.

(छाया : नसिर अत्तार )

फोटो: २८०७२०२१-कोल- चिखली गुऱ्हाळ

फोटो ओळ : करवीर तालुक्यातील चिखली हे गाव म्हणजे गुऱ्हाळघरांचे आगरच, पण महापुराने या गुऱ्हाळघरांची अवस्था डोळ्याने बघवत नाही, अशी केली आहे.

(छाया: नसिर अत्तार )

फोटो: २८०७२०२१-कोल- चिखली धान्य

फोटो ओळ : बरीच दक्षता घेऊनही बऱ्याचजणांचे धान्य पुरात बुडालेच. चिखलीत भिजलेला भात असा रस्त्यावर आणून वाळवण्यात महिला गर्क झाल्या आहेत.

(छाया: नसिर अत्तार )

फोटो: २८०७२०२१-कोल- चिखली ०३

फोटो ओळ : चिखलीत महापुराची पाणीपातळी १० ते १२ फुटांवर असल्याने ती पातळी गृहीत धरून लोकांनी घरातले सामान, धान्य वाचवण्यासाठी घराचे मजले वाढवण्याची शक्कल लढवली आहे. या पुरात त्याचा लाभ झाल्याचेही दिसले.

(छाया: नसिर अत्तार )

फोटो: २८०७२०२१-कोल- चिखली ऊस

फोटो ओळ : महापुराने घरादारांबरोबरच पिकांवरही नांगर फिरवला आहे. ऊस पीक असे जमीनदोस्त झाले असून, त्यावर पुराने वाहून आलेल्या कचऱ्याचा ढीग साचला आहे.

(छाया : नसिर अत्तार )