शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

पूरबाधित नुकसानीची माहिती एका क्लिकवर --ज्ञानदेव वाकुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 23:42 IST

शेतकऱ्यांचे काम कुठेही अडता कामा नये, हेच माझे आजवरचे धोरण राहिले आहे. स्वत: कधी चहा घेत नाही. बाहेर गेलो तरी स्वत:चा डबा जवळ असतो; त्यामुळे कुणाच्या मिंध्यात असण्याचे कारण नाही. जे करायचे ते उत्तमच आणि सर्वांना विश्वासात घेऊनच. साहजिकच याचा परिणाम इतर सहकाऱ्यांवर दिसत असून, कृषी विभागाची प्रतिमाही बदलू लागली आहे. - ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

नसिम सनदी।कोल्हापूर : पूरबाधित गावातील पिकांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचे शिवधनुष्य जिल्'ाच्या कृषी विभागाने यशस्वीपणे पेलले आहे. ड्रोन आणि सॅटेलाईट इमेजचा वापर करून तब्बल २८६ गावांतील पूरबुडीत पिकांचे पंचनामे पूर्ण करून ठेवले आहेत. ही सगळी माहिती आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर अपलोड केली जात आहे. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्याशी यानिमित्ताने साधलेला हा थेट संवाद.

प्रश्न : पंचनाम्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला?उत्तर : मुळातच कृषी विभागाकडे मनुष्यबळ अपुरे आहे. महापुरामुळे बाधित क्षेत्राचे प्रमाण जास्त होते. कमी कालावधीत एवढ्या प्रमाणावरील क्षेत्रात पोहोचणे अवघड असल्यानेच ड्रोन आणि सॅटेलाईटचा आधार घेतला. जवळपास ५०० कर्मचाºयांनी रात्रंदिवस सलग तीन आठवडे काम करून २८६ गावांतील ७८ हजार हेक्टर क्षेत्रावरील तीन लाख आठ हजार शेतकºयांचे पीक नुकसानीचे पंचनामे तयार केले. पाणी कुठवर पसरले आहे, याचे नकाशेही तयार केले आहेत. आता या सर्व माहितीचे वेबसाईटवर अपलोडिंग होणार आहे. आता परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठीची या तंत्राचा चांगल्या प्रकारे वापर करता येणार आहे.

प्रश्न : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी नियुक्ती होऊन वर्ष झाले. वाटचालीतील ठळक बाबी कोणत्या?उत्तर : वर्षभरात खूप चांगले काम करता आले. मी स्वत: काम करतो, इतरांनीही चांगले काम करावे, असा आग्रह असतो. कोणावर कारवाई करण्यापेक्षा चूक दाखवून देऊन त्यांच्याकडून काम करवून घेण्यावर माझा कायम भर राहिला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात कृषी विभागात कधी वादाचे प्रसंग घडले नाहीत. सर्वांना सोबत घेऊनच काम केल्याने राज्यात कोल्हापूरने आदर्शवत काम केले आहे. यात विशेष करून गटशेतीचा उल्लेख करावा लागेल. १३ गटांची स्थापना करून पाच कोटी ७० लाखांचे अनुदान मिळाले. राज्यात हे दुसºया क्रमांकाचे काम आहे. बुलढाणा राज्यात प्रथम क्रमांकावर असला तरी गुणवत्तेच्या बाबतीत कोल्हापूरच पहिल्या क्रमांकाचा मानकरी आहे.

प्रश्न : कृषी योजना राबविताना काय दक्षता घेतली?उत्तर : योजनांचा लाभ देताना जाणीवपूर्वक दिरंगाई होते, असा आरोप होत होता, तो पहिल्यांदा खोडून काढण्याचा मी प्रयत्न केला. रोजच्या रोज पाठपुरावा करून कमीत कमी वेळेत लाभ मिळेल याकडे लक्ष दिले. यावर्षी तब्बल साडेतेरा कोटींची अवजारे विनातक्रार शेतकºयांच्या दारात पोहोचली. शेतकरी सन्मान योजनेचे काम तर मध्यरात्रीपर्यंत थांबून पूर्ण केले.सायकलवरून फिरणारा कृषी अधिकारीवाकुरे सायकलवरून थेट शेतकºयांच्या बांधावर जाणारे जिल्'ातीलच नव्हे तर राज्यातील पहिले कृषी अधिकारी आहेत. कुठल्याही तालुक्यात दौरा असू दे; ते गाडीला सायकल बांधूनच घेऊन जातात. रोज सकाळी किमान २५ किलोमीटर ते सायकलिंग करतातच. शिवाय बैठकीला गेले की वेळ मिळेल तशी सायकल काढून थेट शेतकºयांच्या बांधावर जातात.

आपली ओळख न सांगता शेतकºयांना भेटतात, अडीअडचणी समजून घेतात, परत कार्यालयात आल्यानंतर त्याची पडताळणी करून यंत्रणेला कामालाही लावतात. गेल्या वर्षभरात जवळपास ९0 हून अधिक गावांना त्यांनी अशाच सायकलीद्वारे भेटी दिल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर