शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

योग्यवेळी पाण्याचा विसर्ग करून पूरनियंत्रण करणार, मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 10:49 IST

Flood Kolhapur : महापूर आल्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांना कमीत कमी ४ ते ५ हजार कोटींचा फटका बसतो. यामुळे पूरस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तिन्ही जिल्ह्यांतील धरणांतील धोका पत्करून पाण्याचा विसर्ग करण्याचा व त्याआधारे पूर नियंत्रण करण्याचा निर्णय सोमवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य पूरनियंत्रण बैठकीत हा निर्णय झाला. जलसंपदामंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.

ठळक मुद्दे योग्यवेळी पाण्याचा विसर्ग करून पूरनियंत्रण करणार, मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील संभाव्य पूरनियंत्रणासाठी बैठक

कोल्हापूर : महापूर आल्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांना कमीत कमी ४ ते ५ हजार कोटींचा फटका बसतो. यामुळे पूरस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तिन्ही जिल्ह्यांतील धरणांतील धोका पत्करून पाण्याचा विसर्ग करण्याचा व त्याआधारे पूर नियंत्रण करण्याचा निर्णय सोमवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य पूरनियंत्रण बैठकीत हा निर्णय झाला. जलसंपदामंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदामंत्री जयंत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते. तिन्ही जिल्ह्यांतील आमदार, खासदार ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले.मंत्री पाटील म्हणाले की, मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर, एकाचवेळी सर्व धरणांतील पाणी सोडले जाते. परिणामी महापुराचा धोका निर्माण होतो. यामुळे हा धोका टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने धरणातील पाण्याचे व्यवस्थापन करावे. हवामान आणि पाऊस याचा अभ्यास करून धरणांमधील पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करावे.

मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वीच धरणे रिकामी करावीत. महापूर आल्यानंतर किती गावांतील किती लोकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे, त्याचे नियोजन केले आहे; पण पूरस्थितीच निर्माण होणार नाही, यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी.खासदार संजय मंडलिक म्हणाले की, पावसाचे पाणी अडण्यासाठी अर्धवट पाटबंधारे प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील धामणी धरणाचे काम पूर्ण करावे. राधानगरी धरणाला सर्व्हिस गेट बसवावे. बैठकीत महापुरास पूररेषेतील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचा विषय चर्चेत आला. यावर मंत्री पाटील म्हणाले की, यासंबंधीचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेऊन कार्यवाही करावी.बैठकीच्या सुरुवातीलाच पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हणमंत गुन्हाले यांनी पूर नियंत्रणासाठी केलेल्या सर्व उपायांची माहिती दिली. ते म्हणाले की, कृष्णा खोऱ्यातील नद्यांची पाणीपातळी पावसाळ्यात त्या-त्या वेळी नेमकेपणाने कळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान बसवण्यात येईल. याद्वारे रियल टाईम डाटा अ‍ॅनॅलेसिस सिस्टिम आणि रियल टाईम डिसिजन सपोर्ट सिस्टिम कार्यान्वित करण्यात येईल. यामुळे नद्यांमधील पाणीपातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.बैठकीस आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर आदी अधिकारी उपस्थित होते. आमदार प्रकाश आवाडे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध सूचना केल्या.कर्नाटकात मोठे नुकसानगेल्यावर्षी पूर टाळण्यासाठी कर्नाटक सरकारबरोबर समन्वय ठेवून अलमट्टीचा विसर्ग ५ लाख क्युसेकपर्यंत वाढवला. यामुळे अलमट्टी धरणाच्या खालील बाजूस पूरस्थिती गंभीर झाली. तेथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. हाही मुद्दा या वेळी विचारात घ्यावा, अशी सूचना जलसंपदामंत्री पाटील यांनी दिली. 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर