शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

पूर ओसरू लागला!

By admin | Updated: August 8, 2016 00:44 IST

पाण्याची फूग : पावसाची उसंत तरीही धोका पातळीवर दोन फुटांनी वाहतेय ‘पंचगंगा’

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे खुले झालेले सातही स्वयंचलित दरवाजे रविवारी सकाळी बंद झाले. त्यामुळे धरणातून २२०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. रविवारी पावसाचा जोर कमी असला तरी वारणा व कोयना धरणांतून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विसर्गामुळे पाण्याची फूग निर्माण झाल्याने जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर दोन फुटांनी वाहत असून, सायंकाळी राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४४.९ फुटांवर गेली. मात्र, रात्री पूर ओसरू लागला असून, रात्री ११ वाजता पाणी पातळी ४४.८, १२ वाजता ४४.७ वर आली आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ३६६.६४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ९७ मि.मी. पाऊस पडला आहे. पूरस्थितीमुळे ८ राज्य, तर १७ प्रमुख जिल्हा मार्गावर अद्याप पाणी असल्याने ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, पर्यायी मार्गांवर त्याचा भार पडत आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ६९ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले; परंतु शनिवारपासून पावसाने थोडी उसंत दिली. ती रविवारीही कायम राहिली. उन्हाचे दर्शनही काहीकाळ झाले. रविवारी दिवसभरात हलक्या सरी वगळता पावसाचा जोर दिसला नाही. धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याने शनिवारी सुरू असलेले राधानगरी धरणाचे सातही दरवाजे रविवारी सकाळी बंद करण्यात आले. मात्र ‘वारणे’तून १८ हजार क्युसेक्स व कोयना धरणातून १७ हजार १११ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्या तुलनेत अलमट्टी धरणातून अपेक्षेपेक्षा कमी विसर्ग होत असल्याने पाण्याची फूग निर्माण झाली असून त्यामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. पंचगंगा नदी धोका पातळी ओलांडून दोन फुटांनी वाहत आहे. जिल्हा प्रशासनाने दिवसभरात शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाहणी करून नदीशेजारील भागात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद झाले. २२०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला. त्याचबरोबर वारणा धरणातून १८००० क्युसेक्स, ‘कासारी’तून ३६९७, ‘घटप्रभे’तून २७६७, ‘जांबरे’तून १२४९, ‘कडवी’तून ११२२, ‘कुंभी’तून ९५० व ‘कोदे’मधून ५९९ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. आजरा, गडहिंग्लज, चंदगड मार्गांवरील वाहतूक बंद पूरपरिस्थिी व घाटात दरड कोसळल्याने आजरा तालुक्यातील नवले-देवकांडगाव या मार्गावरील, चंदगड तालुक्यातील गुडवळे, सावर्डे, कोळींद्रे, हलकर्णी या मार्गावरील व गडहिंग्लज तालुक्यातील यमेकोंड, शिरसंगी, किणे, नेसरी, हडलगे, कोवाड, उचगाव या मार्गावरील वाहतूक बंद असून ती पर्यायी मार्गांवरून सुरू ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील २१० घरांची अंशत: पडझड पावसामुळे रविवारी सकाळी आठपर्यंत जिल्ह्यांत २१० घरांची अंशत: पडझड होऊन ३० लाख २६ हजार रुपयांचे नुकसान झाले. तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा- हातकणंगले-४.१२, शिरोळ-२.१४, पन्हाळा-३४.७१, शाहूवाडी-२४, राधानगरी-४५.१७, गगनबावडा-९७, करवीर-१३.२७, कागल-१४.०५, गडहिंग्लज-११, भुदरगड-३०.६०, आजरा-५९.७५,चंदगड-३०.८३. नदीभागातील लोकांना ६९ बंधारे पाण्याखाली पंचगंगा नदीवरील ७ बंधारे, भोगावती नदीवरील ६, तुळशी नदीवरील २, वारणा नदीवरील ९,कासारी नदीवरील ७, कुंभी नदीवरील ४, कडवी नदीवरील ३, धामणी नदीवरील ६, वेदगंगा नदीवरील ६, दूधगंगा नदीवरील ४, हिरण्यकेशी नदीवरील ५, घटप्रभा नदीवरील ५, ताम्रपर्णी नदीवरील २ व जांबरे नदीवरील ३ असे ६९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सतर्कतेचे आदेश राजाराम बंधाऱ्याने धोका पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या व सखल भागांतील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने केले आहे. जयंती नाल्यावरील कचरा उचलण्यासाठी आवाहन पंचगंगेच्या पुराच्या पाण्यामुळे कोल्हापुरातील जयंती नालाही भरला आहे. यामुळे नाल्यातील कचरा काठावर तसेच पुलावरही आला आहे. पाणी वाढल्यास तो वाहून जाऊन जलप्रदूषण होईल किंवा पाणी ओसरले तर कचरा तेथेच राहून त्याची दुर्गंधी निर्माण होईल. हे टाळण्या-साठी तो कचरा तातडीने तेथून हलविण्याची गरज आहे. यासाठी महापालिका तसेच स्वयंसेवी संस्था, संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत’च्यावतीने करण्यात येत आहे. ‘अलमट्टी’चा विसर्ग वाढवायला हवा अलमट्टी धरणात प्रतिसेकंद १ लाख ६२ हजार ६६७ घनफूट पाण्याची आवक होत आहे. त्याच वेगाने हे पाणी या धरणातून विसर्ग होत आहे. कोयना व वारणा धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात झालेला विसर्ग पाहता अलमट्टीमधूनही सद्य:स्थितीपेक्षा जादा विसर्ग होण्याची गरज आहे. येथील विसर्ग कमी असल्याने पाण्याची फूग निर्माण होऊन पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणीपातळी वाढ होत आहे.