शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भडकल्या ज्वाला - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST

‘‘तिचं नाव शेवंती हाय !’’ शेवंतीची काकू मध्येच म्हणाली. ‘‘अहो.. मदी कशाला बोलताय? तिला बोलू दे की पोरगी मुक्की ...

‘‘तिचं नाव शेवंती हाय !’’ शेवंतीची काकू मध्येच म्हणाली.

‘‘अहो.. मदी कशाला बोलताय? तिला बोलू दे की

पोरगी मुक्की हाय का काय? आमास्नी कळाय नगं व्हय? पांडबाची आई जोर देऊन म्हणाली.

‘‘बोल पोरी तुझं नाव सांग’’

‘‘शेवंती रामचंद्र पाटील’’ मुलीनं नाव सांगितलं.

‘‘जेवण सैपाकाचं जमतय का गं?’’

‘‘हो.. जमतय की.’’

‘‘आवं... पोरगी आक्सी ‘सुगरण हाय सुगरण’, पोरगी कशात कमी पडायची न्हाई बाय’’ शेवंतीची काकू म्हणाली.

‘‘असं म्हणता? चला तर मुलगी आम्हांला पसंच हाय.’’

पांडबाच्या आईने आणि बापाने मुलगी पसंत असल्याचे जाहीर केले. यावर रामचंद्र पाटील राम आरडेंना म्हणाले,

‘‘पावणं तुमचा मुलगाही आम्हांला पसंत हाय, तवा बसल्या बैठकीत काय द्याचं, घ्यायचं ते ठरवूया’’

यावर राम आरडे खुशीनं म्हणाले, ‘‘आता ठरवायचं काय हाय त्यात? दोघांकडची पसंती हाय मग झालं तर ! हुंडा, सोनं, नाणं मागून ते काय जलमभर पुरणार हाय व्हई? मला जीवाभावाची माणसं जोडायची हैत. उद्या शेवंती लग्न झाल्यावर माझी सून न्हवं, माझी ‘लेक’ म्हणून लक्ष्मीच्या पावलानं घरी येणार हाय.. हे राम आरडेंचं बोलनं ऐकून राम पाटलांच्या नेत्रात अश्रू दाटून आले आणि राम आरडेंच्या गळ्याला पडून आनंदाने म्हणाले, ‘‘पावणं तुमच्या दिलदार मनानं आणि माणुसकीचं नातं जोडल्यानं या राम पाटलाचं मन तुम्ही जिकलासा.. काय ते लग्नात बघू... ‘‘झाकली मूठ सव्वालाख!’’

पांडुरंग आणि शेवंतीचं लग्न झालं. पाठवणी करताना शेवंती आईबापाच्या गळ्याला पडून रडू लागली आणि आईबापाचे डोळे भरून आले. थोर मन करून तिची पाठवणी केली.

‘‘लेक लाडकी’’

लेक लाडकी या घरची;

आईच्या मायेची बापाच्या छायेची

लेक आमची गुणाची गुणवान

संस्कारक्षम तिचं वागणं.

घर आलं लग्नाला गाडी भरून.

नवरी नटली छान साजश्रृंगार करून

जावई आले थाटा बाशिंग बांधून.

विवाह झाला मोठ्या थाटामाटानं

वाजंत्री गलबला उडाल्या फटाका कडाडून.

लेक केली जावयाच्या स्वाधीन

विरहाने रडली गळ्याला पडून.

डोळ्यात पाणी आलं भरून

सुखाचा डोंगर करून छान.

माहेर अन् सासरची राखली तिने शान.

आता शेवंती लग्न होऊन लक्ष्मीच्या पावलानं आरडे यांच्या घरी आली. आणि संसाराचा सारीपाट सुरू झाला. दोघा नवराबायकोचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. पांडबा शेतात राबायचा आणि शेवंती घर संसारात. शेवंती रोज पाटीत शिदोरी घेऊन शेतात यायची. झाडाखाली गार सावलीत शिदोरी सोडून पांडबाला हाक द्यायची.

‘‘आवंऽऽ.. ऐकलासा कायऽऽ...?

दोघेही जेवून शेतीच्या कामाला लागायची. असा त्यांचा दिनक्रम असायचा. त्या दोघांच्या जीवनात दोन दोन वर्षांच्या अंतराने तीन जीवांनी जन्म घेतला. पहिला मुलगा झाला. त्याचं नाव ‘विश्वास’. दुसऱ्यांदा मुलगी झाली, तिचं नाव सुवर्णा ठेवलं. मुलगी झाल्यावर पांडबा आनंदाने खूश होऊन शेवंतीला म्हणाला, ‘‘शेवते आपल्याला मुलगी झाली. मी लई खुश हाय बघ. शेवंती पदराआड मुलीला पाजवत कौतुकाने म्हणाली, ‘‘अगं बया...? खरंच तुमास्नी आनंद झालाया?

अहो,... मुलगी झाली म्हणून लोक नाराज हुत्यात. तिला जन्माच्या आधीच मारून टाकत्यात. का तर?... सांभाळून मोठी करून तिला दुसऱ्याच्या गळ्यात बांधायला लागतीया म्हणून. ते ऐकून पांडबा पुढे म्हणाला. ‘‘अगं, मी तसा न्हाई... अगं, पोरगी म्हंजी रत्नाची खाण तिच्या पोटात माया असती. अगं गावातला पाटील मेला त्याला पाच पोरं एक पोरगी. सगळ्यांची लग्न झाली. पण बापाला एकानही बघितलं न्हाई... कुणाच्याही डोळ्यात पाणी न्हाई.... शेवटी लेकीनं बापाचं मडं साजरं केलं. पोरीनं हंबरडा फोडला, सारं गाव जमा झालं. पाटलांच्या मयताला जत्री जमली. सारं गाव त्या पोरीला मानतंय, शाबासकी देतय... तशी आपली मुलगी होणार... तिसरा मुलगा झाला. त्याचं नाव बाबासाहेब ठेवले.

आता तिन्ही मुलं मोठी झाली. लग्नाला आलेली होती. अचानक घोडवडे गावच्या डोंगळे पाहुण्याचे राजाराम मुलाचे स्थळ आले. सुवर्णा त्यांना पसंत पडली. सुवर्णा लग्न होऊन सासरी गेली. आता विश्वासच्या लग्नाचा विचार होता. अवचितवाडीचे भीमराव भारमल यांची मुलगी ‘साधना’ हिच्याशी विश्वासचा विवाह होऊन साधना नांदायला आली. पुढे काही दिवसांनी बाबासाहेब लग्नाला आला. त्याला पाटलांचा मुलगा ‘बळवंत हा लग्नानंतर एका मुलीचा बाप होऊन मयत झाला होता. त्याचीच मुलगी ‘साधना’ हिच्याशी बाबासाहेबांचा विवाह होऊन साधनाही नांदायला आली.