शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते कोल्हापूरात ध्वजारोहण

By भारत चव्हाण | Updated: January 26, 2023 12:18 IST

छत्रपती शाहू स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन कोल्हापुरात पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते छत्रपती शाहू स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी वरिष्ठ शासकीय अधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, निवृत्त लष्करी अधिकारी यांच्यासह विविध थरातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. सकाळी सव्वा नऊ वाजता पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर ध्वजवंदन व राष्ट्रगीत झाले. यावेळी पालकमंत्री केसरकर  यांनी परेड निरीक्षण केल्यानंतर पोलिस, होमगार्ड, एनसीसी विद्यार्थी, अग्निशमन दलाचे जवान, व्हाईट आर्मी, स्काऊटगाईड विद्यार्थी, वन विभाग, समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शानदार संचलन करुन पालकमंत्र्यांना सलामी दिली.

या साेहळ्यात पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते माजी सैनिकांना सैन्य सेवेत असताना युध्दजन्य परिस्थितीत अपंगत्व आलेल्या सुभेदार राजाराम कांबळे व हवलदार संभाजी पाटील यांना ताम्रपटाचे वितरण अंतरिक सुरक्षा पदक मिळालेल्या पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, राष्ट्रपती शौर्य पदक पटकावणारे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, पोलिस हवालदार नामदेव यादव, लघु उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट उद्योजक म्हणून पुरस्कार मिळालेले अमर जाधव, वसंतलाल दलाल, विनय  खोबरे, सुवर्णा हराळे, भगवान पवार यांना गौरविण्यात आले. याच वेळी समाज कल्याण, पन्हाळा तहसील कार्यालय, राधानगरी तहसील कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय, सामाजिक वनीकरण विभाग, महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे पुरस्कारांचे तसेच गुणवंत विद्यार्थाच्या गुणगौरवही पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. सर्वात शेवटी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर विद्यार्थ्यांचे झांजपथकाचे तसेच महाराष्ट्र हायस्कूलच्या बाराशे विद्यार्थ्यांचे शानदार सामुदायिक कवायतीचा कार्यक्रम झाला.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनkolhapurकोल्हापूर