शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

फलटणच्या पाच हजार महिला अंबाबाई चरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:37 IST

कोल्हापूर : कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या फलटण-माढा मतदारसंघातील व रयत क्रांती संघटनेच्या पाच हजार महिला कार्यकर्त्यांनी बुधवारी अंबाबाईचे दर्शन घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या फलटण-माढा मतदारसंघातील व रयत क्रांती संघटनेच्या पाच हजार महिला कार्यकर्त्यांनी बुधवारी अंबाबाईचे दर्शन घेतले. सदाभाऊंच्या संघटनेला यश मिळावे यासाठी त्यांनी अंबाबाईला साकडे घातले. मात्र, सायंकाळी अचानक पाऊस आल्याने त्यांची मोठी तारांबळ उडाली.बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान मंत्री सदाभाऊ खोत यांच्या फलटण-माढा मतदारसंघातील पाच हजार महिला भाऊसिंगजी रोडवरून भवानी मंडपातून अंबाबाईच्या दर्शनासाठी आल्या. त्यावेळी अन्य महिला भाविकांची फारशी गर्दी नव्हती. मात्र, गेल्या तीन दिवसांप्रमाणे बुधवारीही सायंकाळी काही काळ पावसाने दमदार हजेरी लावली आणि या महिलांची तारांबळ उडाली. विशेषत: त्यांच्यासोबत असलेली लहान मुलेही भिजली. जागा मिळेल तिथे त्यांनी आडोशाचा आधार घेतला आणि गाभारा दर्शनाच्या रांगेत उभ्या राहिल्या. सातच्या दरम्यान या रांगा संपल्या. यावेळी त्यांनी सदाभाऊंच्या रयत क्रांती संघटनेला यश मिळू दे, असे अंबाबाईला साकडे घातले आणि देवीची ज्योत घेऊन वाळव्याच्या मेळाव्यासाठी घाटी दरवाजा येथून मार्गस्थ झाल्या. अ‍ॅड. जिजामाता रणजित नाईक-निंबाळकर, मदनसा कुंभार, नगरसेविका लक्ष्मीताई नाईक-निंबाळकर, नगरसेविका खरात यांच्या नेतृत्वाखाली या महिला कोल्हापुरात आल्या होत्या.दिवसभरात दोन लाख महिला भाविकदरम्यान, बुधवारी दिवसभरात दोन लाख २९ हजार ८८९ भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. गेले तीन दिवस पावसामुळे भाविकांची संख्या कमी झाल्याने बुधवारी भाविकांनी मंदिरात उपस्थिती लावली. आज, गुरुवारी जागर असल्याने उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता आहे.