शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

पाच हजार नळजोडण्या बेकायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 00:54 IST

इचलकरंजी नगरपालिका सभा : दंडात्मक कारवाईचा निर्णय; खास पथक नेमून शोधमोहीम राबविणार

इचलकरंजी : शहरात असलेल्या इमारतींच्या संख्येच्या प्रमाणात पाणीपुरवठ्याच्या नळजोडण्यांचे प्रमाण अल्प आहे. नगरपालिका हद्दीत किमान पाच हजार नळ जोडण्या बेकायदेशीर असून, त्या शोधून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय नगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यासाठी खास पथक नेमून शोधमोहीम राबविण्याचे यावेळी ठरविण्यात आले.नगरपालिकेची सर्वसाधारण सभा १६ फेब्रुवारी रोजी आयोजित केली होती. मात्र, कोरोची (ता. हातकणंगले) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक प्रचारसभा असल्यामुळे ही सभा तहकूब ठेवण्यात आली होती. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता नगराध्यक्ष अ‍ॅड. अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.सभेमध्ये शहरात असलेल्या अवैध घरगुती नळजोडण्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा विषय चर्चेस आला असताना मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी शहरात ५६ हजार मालमत्ता असून, ३५ हजार पाणीपुरवठा करणाऱ्या नळजोडण्या आहेत, असे स्पष्ट केले. याच विषयावर बोलताना जलअभियंता सुरेश कमळे म्हणाले, शहरामध्ये पाणीपुरवठा विभागाकडून केलेल्या सर्वेक्षणात २२ हजार इमारतींमध्ये नळ जोडण्या नसल्याचे आढळून आले आहे. वास्तविक पाहता इमारतींच्या तुलनेमध्ये आणखीन दहा हजारांहून अधिक नळजोडण्या असणे आवश्यक आहे. मात्र, यापैकी किमान पाच हजार नळ जोडण्या बेकायदेशीर असाव्यात. अशा नळजोडण्या शोधून घरगुती नळासाठी तीन वर्षांची पाणीपट्टी व पाच हजार रुपये दंड, तसेच औद्योगिक नळासाठी तीन वर्षांची पाणीपट्टी व २५ हजार रुपये दंड अशी तरतूद करावी. जलअभियंत्यांनी सूचविलेल्या प्रस्तावानुसार सभागृहाने दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव एकमताने संमत केला.बेकायदेशीर नळ जोडण्यांबाबत बोलताना नगरसेवक बावचकर यांनी नगरपालिकेने वॉटर आॅडीट करून घ्यावे, हा मुद्दा आग्रहाने मांडला. ते म्हणाले, यापूर्वी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी काही अवैध नळ जोडण्या शोधून काढल्या होत्या. त्यांच्यावर कोणती कारवाई केली, असा प्रश्न विचारला. मात्र, त्यावर प्रशासनाला कोणताही खुलासा करता आला नाही. याच सभेमध्ये नगरपालिकेच्या मालकीची मंगल कार्यालये मक्ता पद्धतीने भाड्याने देणे व भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रीमंत घोरपडे नाट्यगृह लग्न व अन्य कार्यांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव मात्र सभेमध्ये फेटाळण्यात आला. हागणदारीमुक्तीची घोषणा बहुमतानेइचलकरंजी शहर हागणदारीमुक्त झाले असल्याची घोषणा सत्तारूढ आघाडीने बहुमताने केली. याच घोषणेबाबत विरोधी कॉँग्रेस व शाहू आघाडीने जोरदार विरोध केला. तेव्हा सत्तारूढ आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. नगरसेवक शशांक बावचकर, विठ्ठल चोपडे, आदींनी हागणदारीमुक्तीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयातील अस्वच्छतेचे वाभाडे काढले आणि शहरामध्ये अद्यापही अनेक ठिकाणी नागरिक उघड्यावर शौच करीत असल्याचे गुडमॉर्निंग पथकाला आढळून येत आहे. त्यानंतर मुख्याधिकारी डॉ. रसाळ व आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी केलेल्या खुलाशानंतरसुद्धा विरोधक समाधानी झाले नाहीत. अखेर सत्तारूढ आघाडीने हागणदारीमुक्तीचा प्रस्ताव ३२ विरुद्ध २६ मतांनी मंजूर केला.