कोल्हापूर : शाहूनगर येथील नवशा मारुती मंदिर परिसरात काल शनिवारी रात्री भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट मॅचवर बॉल टू बॉलवर बोली लावून लोकांच्याकडून बेटिंग घेणाऱ्या पाचजणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, टीव्ही, मोबाईल संच असा सुमारे ५६ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलिसांनी सांगितले, शाहूनगर येथे संशयित आरोपी श्रीधर गायकवाड हा बेटिंग व्यवसायाचा मालक असून, तो भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट मॅचवर बॉल टु बॉलवर बोली लावून लोकांकडून मोबाईलवरून बेटिंग घेत असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ यांना कारवाईचे आदेश दिले. त्यांनी घटनास्थळी जावून खात्री केली असता बेटिंग घेत असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी) अटक केलेले संशयितसंशयित श्रीधर प्रकाश गायकवाड (वय ३४, रा. शाहूनगर), अभिजित जिनगोंडा किणे (२९, रा. राजारामपुरी ८ वी गल्ली), प्रवीण संपत जाडकर (३७, रा. ताराधाम अपार्टमेन्ट, नाळे कॉलनी), सौरभ मनोहर पनवलकर (२३, रा. राजारामपुरी), संग्राम मोहन कनोजे (वय २६, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर).
क्रिकेट बेटिंग प्रकरणी पाचजणांना अटक
By admin | Updated: July 21, 2014 00:46 IST