शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

कार झाडावर आदळून पाच ठार

By admin | Updated: June 5, 2016 01:16 IST

आंब्याजवळ दुर्घटना : मृत पुण्याचे एकाच कुटुंबातील

आंबा : विशाळगड येथील मलिक रेहान बाबांच्या दर्शनास निघालेल्या पुण्यातील एका कुटुंबीयांच्या कारला तळवडे (ता. शाहूवाडी) येथील अपघाती वळणावर भीषण अपघात होऊन त्यामध्ये पाचजण ठार झाले. हा अपघात शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाला. कारचालक इम्रान शरीफ शेख (वय ३८), पत्नी शिफा (३५), वडील शरीफ करीम शेख (७०), आई सलमा (६०) व पुतणी लिबा समीर शेख (९) (सर्व रा. ३२ , घोरपडी, स्वारगेटजवळ, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पुण्यातील घोरपडी येथे राहाणारे शरीफ शेख हे आपली तीन मुले व जावई यांच्या कुटुंबासह सकाळी पुणे येथून सकाळी आठच्या सुमारास चार वेगवेगळ्या वाहनांमधून विशाळगड दर्शनास बाहेर पडले . वारणानगर येथे जेवण करून शेख कुटुंबीय आंबामार्गे विशाळगडकडे निघाले. इम्रान कार (एम. एच.१२ एच. झेड-९८६२) चालवत होते. दुपारी दोनच्या सुमारास त्यांची कार तळवडे येथील अपघाती वळणावर आली असता त्यांचा कारवरील ताबा सुटल्याने ती भरधाव वेगात रस्त्याच्या डाव्या बाजूवरील झाडाला जावून धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, गाडीचे इंजिन तुटून चालकाच्या सीटला टेकले.मागील सीटही मोडून पडली. कारमधील चौघाही जणांच्या डोक्याला गंभीर दुखापती होऊन ते जागीच ठार झाले. अन्य तीन वाहनांतील नातेवाईक पुढे आंब्यातील विशाळगड फाट्यावर चौथ्या वाहनाची वाट पहात होते. मात्र, इम्रान यांच्या कारला महामार्गावर अपघात झाल्याचे समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघातग्रस्तांना स्थानिक तरुणांच्या मदतीने आंबा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे एकटा कंपाउंडर हजर होता. उपचार करण्यासाठी डॉक्टर नसल्याने नातेवाइकांनी संताप व्यक्त करीत जखमी लिबा व सलमा यांना थेट साखरपा आरोग्य केंद्राकडे नेले. छोटी लिबा गंभीर जखमी झाली होती. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी वाटेतच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, येथील १०८ रुग्णसेवेने मृतांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉ. डी. बी. जाधव व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. कारचा चक्काचूर तळवडे वळणावर ठोकरलेली कार प्रथम लोखंडी खांब असलेल्या सूचना फलकावर आदळली. तो खांब उडवून समोरच्या झाडात घुसली. कारचे लाईट पुढे दहा फुटावर फेकले गेले होते. जेवणातील पदार्थ इतरत्र विखुरले होते. त्यावरून अपघात किती भीषण होता, हे स्पष्ठ होते. कुटुंबावर नियतीचा घाला.. इम्रान याचे आई-वडील, भाऊ, भाऊजी असे चौघाचे कुटुंब मलिक रेहान बाबांच्या दर्शनास निघाले होते. पाच पुरुष त्यांच्या पत्नी व पाच मुले असा एकत्रित परिवार चार वाहनांमधून जात असताना त्यातील एका कारला अपघात होवून पाचजण ठार झल्याने े शेख परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला.