शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

तेरवाड सरपंचासह पाचजणांवर गुन्हा

By admin | Updated: August 22, 2015 00:59 IST

जातिवाचक शिवीगाळ, मारहाण : १ सप्टेंबरपर्यंत कोठडी

कुरुंदवाड : झोपाळ्यावर बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून लाथाबुक्क्यांनी मारहाणीसह जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तेरवाड सरपंच संजय नायकू अणुसे (वय ४३), मुलगा संग्रामसिंह संजय अणुसे (१९), पोलीस पाटील वीरुपाक्ष शंकर राजमाने (३१, सर्व, रा. तेरवाड, ता. शिरोळ), संजय ऊर्फ बनाज शिवराम खोंबारे (२८, रा. कुरुंदवाड) यांच्यासह एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, एकाच वेळी एवढ्या लोकांच्यावर जातिवाचक गुन्हा नोंद होण्याची कुरुंदवाडमधील पहिलीच घटना असून, न्यायमूर्ती आर. आर. काळे यांनी आरोपींना १ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. याबाबत किरण आप्पासो कांबळे (२२, रा. तेरवाड) यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिली असून, इचलकरंजी ग्रामीण पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांनी चौकशी करून हा गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी (दि. २०) फिर्यादी किरण कांबळे, सुप्रिया आणुजे, शांताबाई तराळ आणि भाग्यश्री तराळ यांच्यात सायंकाळी चारच्या सुमारास झोपाळ्यावर बसण्यावरून वाद झाला होता. याचा राग मनात धरून संशयित आरोपी संजय अणुसे यांच्यासह पाचजणांनी रात्री सव्वा दहा वाजता बेकायदेशीर जमावाने फिर्यादीच्या घरात घुसून किरणला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तिच्या अंगावरील कपडे फाडली. शिवाय किरण हिच्या आई-वडिलांनाही मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायदा व नागरी हक्क कायद्यान्वये हा गुन्हा दाखल केला आहे. पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सरपंच अणुसे हे शिवसेनेचे असल्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. (वार्ताहर)