रेंदाळ येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलची इमारत आहे. ही इमारत जीर्ण झाल्याने सन 2017-18 मध्ये तळ मजला व पहिल्या मजल्यावर लोखंडी चॅनलचा आधार देऊन विद्यालयाच्या पूर्वेकडील जुन्या इमारतीचा व्हरांडा दुरुस्त केला होता. त्यासाठी ६८४४ किलो वजनाचे ४ लाख ७९ हजार ४८० रुपये किमतीचे लोखंडी साहित्य
खरेदी करण्यात आले होते. कालांतराने हे लोखंडी साहित्य काढले गेले. मात्र, त्यानंतर हे साहित्य कोठे गेले याबाबतची माहिती शाळा प्रशासनाकडे तोंडी, लेखी व माहिती अधिकारात वारंवार मागवूनसुद्धा त्याचा खुलासा अद्यापपर्यंत मिळत नाही. त्यामुळे या लोखंडी साहित्याचा अपहार झाल्याचे दिसून येत आहे. या अपहारात माजी मुख्याध्यापक विष्णू सुबराव पाटील व विद्यमान मुख्याध्यापक संभाजी दत्तात्रय गंगापुरे हे सामील आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी बांधकाम व सल्लागार समितीचे अध्यक्ष सचिन संभाजी मेथे यांनी
केली आहे.
--------::-------