शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पाच विभागांचे वाद्यवृंद तिरंग्यास देणार सलामी

By admin | Updated: April 28, 2017 00:55 IST

एल. ए. मुल्लाणी करणार नेतृत्व : देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या ३0३ फुटी उंच झेंड्याचा लोकार्पण सोहळा

कोल्हापूर : पोलिस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या ३०३ फुटी देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंच तिरंग्याचे लोकार्पण सोमवारी होत आहे. या सोहळ्यात कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण असे पाच विभागांचे वाद्यवृंद सलामी देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणाऱ्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंच अशा तिरंग्याला कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच विभागांतील वाद्यवृंद सलामी देणार आहेत. या वाद्यवृंद पथकाचे नेतृत्व सातारा पोलिस दलाचे वाद्यवृंद मास्तर सहायक फौजदार एल. ए. मुल्लाणी हे करणार आहेत. मुल्लाणी यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक व पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त झालेले आहे. ते स्वत:ही कोरॅनेट व ट्रॅम्पेट वाजवतात. त्यांना बी. एम. जाधव (सांगली), एल. वायदंडे (पुणे ग्रामीण), एम. माने (सोलापूर ग्रामीण), श्रीकांत कोरवी (कोल्हापूर) हे वाद्यवृंद मास्तर साहाय्य करणार आहेत. या पथकात कोल्हापूर - १३, सातारा - १४, सांगली- १३, पुणे ग्रामीणचे १४, सोलापूर ग्रामीणचे ११ असे ६४ जणांचे वाद्यवृंद पथक चार धून वाजवून सलामी देणार आहेत. या पथकांमध्ये ट्रॅम्पेट, कोरॅनेट, इम्पोरियम, अ‍ॅल्टो सॅक्सोफोन, बेस ड्रम, साईड ड्रम, सिबॉल आदी वाद्यवृंद साहित्याचा समावेश आहे. या मानवंदनेची तयारी गुरुवारी सायंकाळी पोलिस कवायत मैदान येथे सुरू होती. त्यात पाच विभागांतील वाद्यवृंद पथकाचे कर्मचारी सहभागी झाले होते. १२ मिनिटांत फडकविणारमहाकाय असा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा तिरंगा एकूण १२ मिनिटांत फडकावला जाणार आहे. त्यात ध्वज वर चढत असताना स्लो मार्च अर्थात सलामी शास्त्राप्रमाणे प्रथम महाराष्ट्र गीत, प्रियदर्शनी गीत, सारे जहाँसे अच्छा आणि ध्वज पूर्ण स्थिरावल्यानंतर शेवटी ५२ सेकंदात राष्ट्रगीताची धून वाजविली जाणार आहे. हे माझे भाग्य : मुल्लाणीदेशातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच असलेल्या तिरंग्याला सलामी देण्याचे भाग्य मला लाभत आहे. कारण माझी निवृत्ती ३१ मे रोजी होत आहे. मी गेल्या ३९ वर्षांत वाद्यवृंद पथकात काम केले आहे. गेल्या ९ वर्षांपूर्वी मला सातारा पोलिस दलातील वाद्यवृंदाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. सेवाकाळात मला राष्ट्रपती पदक, पोलिस महासंचालकाचे सन्मानचिन्ह, असे बहुमान मिळाले आहेत. त्यात सेवानिवृत्तीनजीक मला हा बहुमान मिळत आहे. त्यामुळे मला मिळालेल्या या संधीचा सार्थ अभिमान आहे, असे मत ‘लोकमत’शी बोलताना सहायक पोलिस उपनिरीक्षक एल. ए. मुल्लाणी यांनी व्यक्त केले. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या तिरंग्याला वाद्यवृंदाच्या माध्यमातून सलामी देण्याची संधी केवळ एक दिवसाने हुकली. कारण मी ३९ वर्षांच्या सेवेनंतर ३० एप्रिलला निवृत्त होत आहे तर तिरंगा लोकार्पण सोहळा १ मे रोजी होत आहे. मात्र, माझे सर्व सहकारी ही कसर भरून काढून उत्कृष्टरित्या ठरवून दिलेल्या गीतांची धून वाजवून सलामी देतील. - रफिक पठाण, वाद्यवृंद पथक मास्तर, कोल्हापूर पोलिस दल