शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

मासे फेकले ‘प्रदूषण’च्या कार्यालयात

By admin | Updated: April 8, 2015 00:34 IST

मानवाधिकार न्याय संघटनेचे आंदोलन : ‘पंचगंगा’ प्रदुषणप्रश्नी राजाराम कारखान्यावर कारवाईची मागणी

कोल्हापूर : पंचगंगा नदीतील मृत मासे मंगळवारी मानवाधिकार न्याय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात फेकून निषेध नोंदविला. मासे मृत होण्यास जबाबदार ठरलेल्या राजाराम कारखान्यावर कठोर करवाई करावी, अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या घरी मृत मासे पोहोच करण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.शिये (ता. करवीर) हद्दीत पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याचे रविवारी (दि. ५) सायंकाळी उघडकीस आले. त्यानंतर प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) तक्रार केली. सोमवारी देसाई यांच्यासह एमपीसीबी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कसबा बावड्यातील राजाराम बंधारा ते शिये पुलादरम्यान नदीपात्राची पाहणी केली. त्यावेळी उंबरमळी भागातून राजाराम साखर कारखान्याने मळीमिश्रित पाणी नदीत सोडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मंडळाने कारखान्यास नोटीस दिली. मृत माशांमुळे दुर्गंधी सुटली आहे. ते नदीतून काढण्याकडे ‘प्रदूषण’च्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त मानवाधिकार न्याय संघटनेचे पदाधिकारी पंचगंगा नदीतून मृत मासे पोत्यातून घेऊन आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिरडीवर मृत मासे ठेवून जवळच असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाकडे त्यांनी मोर्चा वळविला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी करीत दुपारी दोनच्या सुमारास ते कार्यालयात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाच्या आवारात मृत माशांचे दफन करावे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी याला विरोध केला. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी प्रदूषणच्या कार्यालयात मृत मासे फेकले. अधिकाऱ्यांच्या अंगावरही मासे फेकण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यानंतर अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाला. परिणामी काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्वरित पोलीस आल्यामुळे तणाव निवळला.संघटनेचे विशाल टेंबुगडे, विजय जाधव, उदय घाडगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आधिकाऱ्यांना निलंबित करावेउपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीष होळकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, राजाराम कारखान्याने मळीमिश्रित पाणी पंचगंगेत सोडले आहे. हजारो मासे मृत झाले आहेत. कारखान्यांवर कठोर कारवाई करावी. कारखान्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबित करावे. यावेळी होळकर यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.