शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा पहिला बळी, कणेरकर नगरातील बाधित वृद्ध सराफाचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 16:21 IST

कोल्हापूर येथील कणेरकर नगरातील कोरोना बाधित सराफाचा आज मृत्यु झाला. हा कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा नववा तर महापालिका क्षेत्रातील पहिला बळी आहे. कोल्हापूर शहरातील कणेरकरनगर भागात आणखीन चार नवे रुग्ण सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देमहापालिका क्षेत्रातील कोरोनाचा पहिला बळीकणेरकर नगरातील बाधित सराफाचा मृत्यु

कोल्हापूर : येथील कणेरकर नगरातील कोरोना बाधित वृद्ध सराफाचा (वय ६२) आज सकाळी ७ वाजता मृत्यु झाला. हा कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा नववा तर महापालिका क्षेत्रातील पहिला बळी आहे. कोल्हापूर शहरातील कणेरकरनगर भागात आणखीन चार नवे रुग्ण सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या दोन दिवसात कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची रुग्ण संख्या वाढतच आहे. काल दिवसभरात एकूण १५ कोरोना बाधित आढळले, त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ७६५ वर पोहोचली.

एकूण ७१० व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत तर कालपर्यंत ४७ बाधित रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. येथे उपचार घेत असलेल्या न्यू कणेरकरनगरमधील या सराफाची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी ७ वाजता त्याचा मृत्यू झाला, यामुळे शहरातील जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्यूची संख्या आता नऊ वर पोहोचली आहे.दरम्यान, कणेरकरनगर भागातील नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये पुन्हा चार नवीन रुग्ण आढळल्यामुळे या भागात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या वृद्ध सराफाचा मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या शववाहिकेतून पंचगंगा स्मशानभूमीत नेण्यात आला. महानगर पालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर