शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ठरलेली पहिली उचल देणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:04 IST

सेनापती कापशी : यंदा साखर कारखाने सुरू झाले, त्यावेळी साखरेचे दर ३६०० रुपये प्रतिक्विंटल असे होते. त्यानंतर दोन ते अडीच महिन्यांत साखर दरामध्ये ८०० रुपयांची घसरण होऊन ते २८०० रुपयांवर आले. परिणामी कारखानदारांना ठरलेली उचल देणे केवळ अशक्य झाले. पण सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या वतीने या गळीत हंगामातील टनाला ...

सेनापती कापशी : यंदा साखर कारखाने सुरू झाले, त्यावेळी साखरेचे दर ३६०० रुपये प्रतिक्विंटल असे होते. त्यानंतर दोन ते अडीच महिन्यांत साखर दरामध्ये ८०० रुपयांची घसरण होऊन ते २८०० रुपयांवर आले. परिणामी कारखानदारांना ठरलेली उचल देणे केवळ अशक्य झाले. पण सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या वतीने या गळीत हंगामातील टनाला ठरलेली तीन हजार रुपयांची पहिली उचल कोणत्याही परिस्थितीत देणारच, असा विश्वास संस्थापक आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) कारखाना कार्यस्थळावर ८ लाख १ हजार १११ साखर पोत्यांच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपतराव फराकटे होते.ते म्हणाले, सद्य:स्थितीत साखर दरात झालेली घसरण, बँकांचे घटलेले मूल्यांकन त्यामुळे कारखान्यांकडे २००० ते २१०० रुपयेच उपलब्ध होतात. यामुळेच २५०० रुपये दर देण्याचा निर्णय कारखानदारांचा झाला. घोरपडे कारखान्याने पूर्वीच्या तीन पंधरवड्यांची बिले टनाला ३००० रुपयांनी काढली आहेत. उर्वरित टनाला ५०० रुपयांचा फरक निश्चितपणे अदा करू. याबाबत ऊस उत्पादकांनी काळजी करू नये.यावेळी भय्या माने यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी स्वागत केले. जनरल मॅनेजर महेश जोशी यांनी प्रास्ताविक केले. संतोष मोरबाळे यांनी आभार मानले. संघाचे अध्यक्ष सूर्याजी घोरपडे, पं. स. सदस्य जे. डी. मुसळे, अंकुश पाटील, प्रवीण भोसले, शिरीष देसाई, जयवंत पाटील-कासारीकर, शामराव पाटील, सतीश पाटील, मनोज फराकटे व सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.दोन वर्षांत विस्तारीकरणसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने दोन हंगामात गाळप क्षमता ६ हजारांवरून ८ हजार मे. टन, सहवीज निर्मिती २३ वरून ४५ मेगावॅट व इथेनॉल निर्मिती दररोज ३५ हजारांवरून १ लाख लिटर असे विस्तारीकरण करणार आहे. या संबंधीच्या सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. त्यापैकी पहिला टप्पा म्हणून येत्या हंगामातच इथेनॉल निर्मिती ३५ हजारांवरून ५० हजार लिटर सुरू करणार आहोत. तरी यासाठी सर्वांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.