शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पहिली आॅनलाईन सैन्यभरती सुरू

By admin | Updated: February 4, 2016 01:10 IST

५७ हजार जणांची नोंदणी : कोल्हापुरात पहिल्या दिवशी दोन हजार ४७७ उमेदवारांची हजेरी; जिल्हानिहाय भरतीला प्रतिसाद

कोल्हापूर : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी शिवाजी विद्यापीठातील क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडासंकुलात बुधवारी पहाटे प्रारंभ झाला. राज्यातील पहिल्याच जिल्हानिहाय आॅनलाईन पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबविली जात असल्याने तब्बल ५७ हजार उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली आहे. बुधवारी पहिल्या दिवशी रत्नागिरी जिल्हा व सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्या दिवशी दोन हजार ४७७ उमेदवारांनी हजेरी लावली. भरती प्रक्रियेचे नियोजन जिल्हा सैनिक कार्यालय व सैन्यभरती कार्यालयातर्फे केले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी तसेच गोव्यासाठी २० फेब्रुवारीअखेर भरती मेळावा होईल. यामध्ये सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर क्लार्क, स्टोअरकीपर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल, सोल्जर ट्रेडस्मन ही पदे आहेत. बुधवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून भरती प्रक्रियेस प्रारंभ झाला. सायबर चौकाजवळील शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातून उमेदवारांना प्रवेश देण्यात येत होता. या ठिकाणी प्रवेशपत्र (अ‍ॅडमिट कार्ड) असलेल्या उमेदवारांनाच प्रवेश दिला जात होता. या प्रवेशद्वारापासून मैदानापर्यंत दोन्ही बाजूंना बॅरिकेटस् लावून एका रांगेतून उमेदवारांना सोडण्यात येत होते. या ठिकाणी त्यांची आॅनलाईन नोंदणी कोणत्या पदासाठी केली आहे, हे पाहून उमेदवारांना धावण्याच्या चाचणीसाठी पुढे पाठविण्यात आले. सुमारे १२० ते १२५ मुलांचे गट करून धावण्याच्या प्रक्रियेसाठी पाठवून चाचणी घेण्यात येत होती. ती ठराविक वेळेत जे उमेदवार पार करीत होते, त्यांची बायोमेट्रिक नोंद करण्यात येत होती. या ठिकाणी कागदपत्रे तपासून पुढे त्यांच्या पुलअप्स् काढण्याची चाचणी घेण्यात येत होती. यानंतर पुन्हा एकादा बायोमेट्रिक घेऊन प्रत्येकाची उंची, वजन, छाती यांचे मोजमाप करून आॅनलाईन नोंदणी करण्यात येत होती. या सर्व प्राथमिक फेरीत निवड झालेल्या उमेदवारांची रविवारी (दि. ७) वैद्यकीय तपासणी व त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. आज, गुरुवारी सांगली जिल्ह्यासाठी सैन्य मेळावा होणार आहे. भरतीच्या जिल्हानिहाय तारखा आजपासून ६ फेब्रुवारीपर्यंत : सांगली ७ फेब्रुवारी : वैद्यकीय चाचणी ८ व ९ फेब्रुवारी : सोलापूर १० ते १२ फेब्रुवारी : कोल्हापूर १३ फेब्रुवारी : वैद्यकीय चाचणी १४ फेब्रुवारी : सिंधुदुर्ग व गोवा १५ ते १७ फेब्रुवारी : सातारा १८ ते २० फेब्रुवारी : वैद्यकीय चाचणी भरतीसाठी एसटीकडून जादा गाड्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी पहिल्या दिवशी भरती प्रक्रिया होणार असल्याने महामंडळाच्यावतीने जादा आठ गाड्यांचे नियोजन केले होते. रत्नागिरी येथून थेट भरती प्रक्रिया सुरू असलेल्या विद्यापीठातील भरती ठिकाणापर्यंत गाड्यांची विशेष सोय केली होती. तसेच ‘केएमटी’तर्फे मध्यवर्ती बसस्थानक ते भरती मेळावाच्या ठिकाणी व पुन्हा परत मध्यवर्ती बसस्थानक अशा दोन विशेष गाड्यांची सोय होती. तसेच या मार्गावरील १९ गाड्यांमार्फत उमेदवारांची ने-आण करण्यात येत होती.