शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मनपाची पहिली ‘आयएसओ’प्राप्त शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:37 IST

प्रदीप शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जाधववाडी येथील महानगरपालिकेच्या प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, क्र. ३२ या शाळेने ‘सर्वांगीण ...

प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जाधववाडी येथील महानगरपालिकेच्या प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, क्र. ३२ या शाळेने ‘सर्वांगीण विकास’ हा निकष पूर्ण करीत ‘आयएसओ ९००१ : २०१५’ प्रमाणपत्र मिळविले आहे. आयएसओ मानांकन मिळविणारी महापालिकेची ही पहिली शाळा ठरली आहे.जाधववाडी येथे शाळेची स्थापना १९५० साली सुरू झाली. जाधववाडी, कदमवाडी, संत गोरा कुंभार वसाहत, राजीव गांधी वसाहत, गांधीनगर, मुक्त सैनिक वसाहतसह रुईकर कॉलनी, रुकडी, रुईकर कॉलनी येथील विद्यार्थी या शाळेत शिकतात. या शाळेत बालवाडीसह मराठी व सेमी-इंग्रजी असे पहिली ते सातवीपर्यंत वर्ग भरतात. शाळेत ४८७ विद्यार्थी शिक्षण घेतात. बहुतेक मुलांचे पालक मध्यमवर्गीय आहेत. सामान्य मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अगोदर श्रमदान आणि मग उरलेल्या कामासाठी निधिसंकलन हे सूत्र ठरून शाळेने वाटचाल सुरू केली; त्यामुळे शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे.शाळेची सुशोभित इमारत, पहिलीपासून सेमी-इंग्लिश, बोलक्या भिंती, ई-लर्निंग सुविधा, वर्गामध्ये ग्रीन बोर्ड, अशा वैशिष्ट्यांसह दर्जेदार शिक्षणामुळे पटसंख्येचा आलेख दरवर्षी वाढत आहे. विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी अ‍ॅक्वागार्डही शाळेत बसविले आहेत. विद्यार्थी वाचनालय यासारख्या वेगळ्या संकल्पना राबविल्या आहेत. शिष्यवृत्तीसह अन्य शाळाबाह्य परीक्षांतही विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे. माजी महापौर वैशाली डकरे, विद्यमान नगरसेवक राजसिंह शेळके यांच्या प्रयत्नांमुळे शाळेचा कायापालट झाला आहे. परिसरातील अनेक दानशूरांच्या सहकार्यातून शाळेला सुविधा दिली आहे.विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच शारीरिक विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे शहरस्तर क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशिपचे उपविजेतेपद शाळेने पटकाविले आहे. शासनाकडून शाळेसाठी कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉलसाठी मैदान मंजूर झाले आहे. शाळेचा परिपाठ वैशिष्ट्यपूर्ण असून, रोज वेगळी प्रार्थना, समूहगीत म्हटले जाते. वाढदिवसाला ‘चॉकलेटऐवजी पुस्तक भेट द्या,’ या उपक्रमातून ३०० पेक्षा अधिक पुस्तके शाळेमध्ये जमा झाली आहेत. शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याने पालक वर्गही समाधानी आहे.शंभर निकष पूर्ण करून मानांकन प्राप्तशाळेने मे २०१६ मध्ये आयएसओ मानांकनासाठी संस्थेला माहिती सादर केली. जून महिन्यात अ‍ॅक्रिडिटेशन बोर्डाकडून पाहणी केली. शाळेकडून आएसओसाठी २३ जुलैला नोंदणी केली. संस्थेच्या त्रिसदस्यीय समितीकडून २५ आॅगस्टला शाळेची तपासणी करून त्रुटी दूर करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी दिला. त्रुटी दूर करून ५ सप्टेंबर २०१६ रोजी आयएसओ मानांकन जाहीर. १०० निकष पूर्ण करून हा मान मिळविला आहे. यामध्ये ७० टक्के भौतिक सुविधा, तर ३० टक्के गुणवत्तेवर गुण दिले.