शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

करंबळी येथे झाले पहिले नेत्रदान

By admin | Updated: September 17, 2014 00:51 IST

चळवळीतले तेरावे : सलपे कुटुंबीयांचा आदर्शवत निर्णय

गडहिंग्लज : नेत्रदान चळवळीतील करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील कार्यकर्ते संतोष गणू सलपे (वय ३२) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. सलपे कुटुंबीयांनी आदर्शवत निर्णय घेतानाच समाजासमोर कृतिशील वस्तूपाठ घालून दिला. करंबळीतील पहिले, तर चळवळीतील हे तेरावे नेत्रदान ठरले.अत्याळ (ता. गडहिंग्लज) ग्रामस्थांनी राजकीय गट तट बाजूला ठेवून एकत्र येत दोन वर्षांपूर्वी मरणोत्तर नेत्रदान चळवळीची सुरुवात केली. गावात आतापर्यंत ११ जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. अत्याळपाठोपाठ शेजारच्या बेळगुंदी गावातही महिनाभरापूर्वी एक नेत्रदान झाले आहे. करंबळी ग्रामस्थांनी एकत्र येत सव्वा वर्षापूर्वी गावात चळवळीची सुरुवात केली. प्रबोधनाच्या पातळीवर काम सुरू असले तरी प्रत्यक्ष नेत्रदान मिळाले नव्हते. करंबळीत नेत्रदान चळवळ सुरू करण्यात संतोष सलपे आघाडीवर होते. घरोघरी जाऊन ग्रामस्थांना नेत्रदानाचे महत्त्व समजावून देण्याचे कामही त्यांनी केले होते. दुर्दैवाने अल्पशा आजाराने त्यांचे सोमवारी (दि. १६) दुपारी निधन झाले.येथील डॉ. घाळी महाविद्यालयात लिपीक म्हणून कार्यरत असणारे त्यांचे मोठे बंधू भैरू सलपे यांनी संतोष यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. येथील अंकुर आय हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाने नेत्रगोल काढण्याची प्रक्रिया पार पाडली. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे.(प्रतिनिधी)