शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Kolhapur: रस्त्याच्या कामात आधी टक्केवारी, आता भागिदारीच; शिवसेना ठाकरे गटाचा गंभीर आरोप

By भारत चव्हाण | Updated: September 18, 2023 15:54 IST

काही लोकप्रतिनिधींच्या व्यक्तिगत स्वार्थापोटी प्रशासनाला हाताला धरुन काही ठराविक कंत्राटदारांनाच कामे देण्याचा घाट घातला जातो

कोल्हापूर : महानगरपालिकेत रस्त्यांच्या कामात आधी टक्केवारी होती, आता थेट भागीदारी झाल्याचा आरोप उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सोमवारी करण्यात आला. ज्या कंत्राटदारांनी केलेले रस्ते दायित्व कालावधीत खराब झाले त्यांना ब्लॅकलिस्ट करुन यापुढे कामे देण्याचे बंद करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी दुपारी महानगरपालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन शहरातील खराब रस्ते, दायित्व कालावधीत खराब झालेले रस्ते आणि नव्याने होऊ घातलेले रस्ते या अनुषंगाने चर्चा केली. चर्चेदरम्यान हा आरोप करण्यात आला. यावेळी एक निवेदनही त्यांना देण्यात आले. महापालिका निविदा प्रक्रिया ई-निविदा पध्दतीने राबविल्या जात असून देखील निव्वळ शासनाकडून मिळणारा निधी हा काही लोकप्रतिनिधींच्या व्यक्तिगत स्वार्थापोटी प्रशासनाला हाताला धरुन काही ठराविक कंत्राटदारांनाच कामे देण्याचा घाट घातला जातो, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण ११५ कामांपैकी ६५ कामे ही ठराविक कंत्राटदारांना दिली आहेत. परंतू याच कंत्राटदारांनी केलेल्या खराब रस्त्यांमुळे प्रशासनाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले होते, असे यावेळी सांगण्यात आले. 

दायित्व कालावधीत खराब झालेल्या रस्त्याबाबत यापूर्वीच्या प्रशासकांनी कंत्राटदारांना नोटीसा बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. असे असूनही प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींच्या दबावापोटी सत्तर टक्के रक्कम कंत्राटदारांना देऊन शासनाच्या निधीवर डल्ला मारला असल्याकडेही लक्ष  वेधण्यात आले. 

शिष्टमंडळात संजय पवार, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, राजू जाधव, राहुल माळी, धनाजी दळवी, धनाजी यादव, संजय जाधव,दिनेश साळोखे, राजेंद्र पाटील, गोविंदा वाघमारे, दत्ताजी टीपुगडे, शशिकांत बिडकर, स्मिता सावंत, प्रतिज्ञा उत्तुरे, विजया भंडारी, दिपाली शिंदे, कमलाकर जगदाळे, संतोष रेडेकर यांचा समावेश होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना