शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शिरोली दुमाला येथे हवेत गोळीबार

By admin | Updated: June 4, 2014 00:07 IST

एकास अटक : सामाईक भिंतीवरुन वाद

 कोल्हापूर : सामाईक भिंतीच्या कारणावरून शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे आज, मंगळवारी सकाळी हवेत गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबार प्रकरणी करवीर पोलिसांनी संशयित राहुल तुकाराम पाटील (वय ३४, रा. शिरोली दुमाला) याला रात्री उशिरा अटक केली. त्याच्याजवळील ०.३२ चे रिव्हॉल्व्हर, बंदुकीची गोळी पोलिसांनी जप्त केली. दरम्यान, हे प्रकरण आपापसांत मिटवण्यात आले होते. परंतु, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांना दिले होते. त्यानुसार ढोमे यांनी गुन्हा दाखल केला. राहुल हा ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वास नारायण पाटील यांचा पुतण्या आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शिरोली दुमाला येथील तुकाराम नारायण पाटील व दत्तात्रय सदाशिव पाटील या दोघा चुलत भावांत गेल्या काही वर्षांपासून सामाईक भिंतीवरून वाद सुरू आहे. आज या वादातून रागाच्या भरात तुकाराम पाटील यांचा मुलगा संशयित राहुल याने घरातून रिव्हॉल्व्हर आणून हवेत गोळीबार केला. त्यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, पोलीस निरीक्षक ढोमे यांना मोबाईलवरून निनावी फोन आला. ते स्वत: पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांसह घटनास्थळी गेले. त्यांनी ग्रामस्थांकडून माहिती घेतली, पण त्यांना गावात असा प्रकार घडला नसल्याचे सांगितले. त्यांनी हा प्रकार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना कळविला. त्यानंतर शर्मा यांनी योग्य तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दिवसभर पोलिसांनी तपास करून रात्री संशयित राहुल पाटील याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३० नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली व त्याच्याजवळील रिव्हॉल्व्हर जप्त केले. राहुल पाटील याने २०१० साली या रिव्हॉल्व्हरचा परवाना घेतला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक पी. के. ताटे यांनी दिली. (प्रतिनिधी) राजकीय नेत्यांचे फोन हे प्रकरण मिटविण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांचे फोन पोलीस निरीक्षक ढोमे यांना आले, पण पोलिसांनी यांना न जुमानता संशयितावर गुन्हा दाखल केला. दिवसभर करवीर पोलीस ठाण्यात काही राजकीय नेते थांबून होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर नेत्यांनी काढता पाय घेतला. दोघांचे जबाब शिरोली दुमालातील घटनेनंतर पोलिसांनी तुकाराम पाटील व दत्तात्रय पाटील यांचे जबाब घेतले. त्यांनी धक्काबुक्की झाल्याचे, तसेच असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे म्हटले आहे, असे पोलीस निरीक्षक ढोमे यांनी सांगितले.