शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच पेटवली चूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 11:43 IST

टेंबलाईवाडी येथील झोपडपट्टीवर कारवाई केल्यामुळे बेघर झालेल्या परिसरातील नागरिकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच चूल पेटवून जेवण करीत अभिनव पद्धतीने आंदोलन केले. पर्यायी जागा दिल्याशिवाय हलणार नाही, अशी ठाम भूमिकाही त्यांनी घेतली.

ठळक मुद्देटेंबलाईवाडी येथील बेघरांचा आक्रोश पर्याय दिल्याशिवाय जागा सोडणार नसल्याचा निर्धार

कोल्हापूर : टेंबलाईवाडी येथील झोपडपट्टीवर कारवाई केल्यामुळे बेघर झालेल्या परिसरातील नागरिकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच चूल पेटवून जेवण करीत अभिनव पद्धतीने आंदोलन केले. पर्यायी जागा दिल्याशिवाय हलणार नाही, अशी ठाम भूमिकाही त्यांनी घेतली.टेंबलाईवाडी येथील गट नंबर ५ अ-१-अ पैकी महापालिकेच्या हद्दीमधील रिकाम्या जागेवर गेल्या काही दिवसांपासून ९० बेघरांनी झोपड्या मारल्या होत्या. प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी पोलीस बळाच्या साहाय्याने झोपडपट्ट्या हटविल्या. याच्या निषेधार्थ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. येथील रहिवासी बाळाबाई बागडे या महिलने चक्क प्रवेशद्वारातच चूल पेटवून जेवण करीत प्रशासनाचा निषेध केला. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना मागण्यांचे निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने पोलीस बळाचा गैरवापर करीत झोपड्या उद्ध्वस्त केल्या. यावेळी महिलांना मारहाण करण्यात आली. यामध्ये धर्मा सावंत ही महिला जखमी झाली असून, त्यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू आहेत. ही शासकीय जागा आहे; परंतु झोपडपट्टीधारकांशी चर्चा न करताच दडपशाहीचा वापर करून झोपड्या उद्ध्वस्त केल्या. सर्वजण बेघर झाले असून प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष घालावे.

बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. यावर निवासी उपजिल्हाधिकारी गलांडे यांनी ‘या प्रकरणी चौकशी करू,’ अशी ग्वाही दिली. यावेळी धनाजी सकटे, दीपक सावंत, रामचरण रवी, अजित लोखंडे, सर्जेराव कांबळे, संजय चौगले, अनिल माने, भीमराव कांबळे, सुरेश बागडे, प्रफुल्ल कांबळे, अजित कोराणे, किशोर गारवे, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkolhapurकोल्हापूर