शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणासाठी ‘गडहिंग्लज’ संपविला

By admin | Updated: March 22, 2016 00:36 IST

सुरेश हाळवणकर : कारखान्याच्या गतवैभवासाठी विस्तारीकरण गरजेचे; भडगावात काळभैरव पॅनेलचा मेळावा

गडहिंग्लज : गडहिंग्लज कारखान्यातील सत्तेचा वापर केवळ राजकारणासाठीच झाला. त्यामुळेच नेते मोठे झाले आणि कारखाना आहे तिथेच राहिला. किंबहुना, स्वार्थी राजकारणामुळेच गडहिंग्लज कारखान्याची अधोगती झाली, असे स्पष्ट मत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केले.भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे श्री काळभैरी शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. माजी आमदार संजय घाटगे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, भाजपचे जिल्हा संघटक बाबा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.हाळवणकर म्हणाले, गडहिंग्लज कारखान्याच्या गतवैभवासाठी गाळप क्षमतावाढ आणि विस्तारीकरणाशिवाय पर्याय नाही. भूमिपुत्रांच्या हाती सूत्रे आल्याशिवाय कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा होणार नाही. शेतकऱ्यांच्या व कारखान्याच्या भल्यासाठी राज्याचे सर्वतोपरी सहकार्य राहील.डॉ. प्रकाश शहापूरकर म्हणाले, नलवडे यांच्या सह्यांचे अधिकार काढून घेण्याच्या प्रकाराशी माझा काडीचा संबंध नाही. त्यावेळी मी केवळ साधा संचालक होतो. पॅनेलचे नेते कुपेकर यांच्या सांगण्यावरूनच नलवडे यांचे अधिकार काढून उपाध्यक्ष विलासराव बागी यांना देण्यात आले. बेकायदा नेमलेल्या ४२९ कामगारांच्या पगारपत्रकावर नलवडे यांनीच सही केली नव्हती. त्यामुळे त्या कामगारांना काढून टाकण्याशीही माझा संबंध नव्हता.उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, प्रा. किसनराव कुराडे, घाटगे, देवणे यांचीही भाषणे झाली. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, सदानंद हत्तरकी, संग्राम कुपेकर, परशराम तावरे, पुंडलिक धनवडे, अनिल खोत, दिलीप माने, वसंत नाईक, आदींसह उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते. सुभाष चोथे यांनी प्रास्ताविक केले. गणपतराव पट्टणकुडी यांनी सूत्रसंचालन केले. दयानंद कोणकेरी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनडॉ. शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे सत्ता आल्यानंतर ‘ब्रीसक्’च्या कराराचा हिशेब तपासून त्यांचा हिशेब चुकता करून कंपनीला परत पाठवू आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कारखान्याच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन केले जाईल, अशी ग्वाही आमदार हाळवणकर यांनी यावेळी दिली.