शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

स्वत: चा नाकर्तेपणा लपवण्यासाठी राज्याचे केंद्र सरकारकडे बोट : फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 17:59 IST

सध्या कोरोनाच्या काळामध्ये राज्यातील महाविकास आघाडीचा नाकर्तेपणा जनतेला दिसत आहे. तो लपविण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम सुरू आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोल्हापूरची कोरोना स्थिती गंभीर असल्याचेही ते म्हणाले.

ठळक मुद्देस्वत: चा नाकर्तेपणा लपवण्यासाठी राज्याचे केंद्र सरकारकडे बोट देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, कोल्हापूरची स्थिती गंभीर

कोल्हापूर : सध्या कोरोनाच्या काळामध्ये राज्यातील महाविकास आघाडीचा नाकर्तेपणा जनतेला दिसत आहे. तो लपविण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम सुरू आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोल्हापूरची कोरोना स्थिती गंभीर असल्याचेही ते म्हणाले.फडणवीस यांनी शनिवारी दुपारी कोल्हापूरमध्ये सीपीआर रुग्णालयाला भेट दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते.उद्धव ठाकरे यांनी बिगर-भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन बैठकीवेळी मोदी यांच्याविरोधी भूमिका मांडली. याबाबत विचारणा केली असता फडणवीस म्हणाले, सध्याचे सरकार स्वत:चा नाकर्तेपणा लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे.

उलट पीएम केअर फंडातून वैद्यकीय उपकरणांसाठी सर्वाधिक निधी महाराष्ट्राला देण्यात आला आहे; परंतु हा नाकर्तेपणा जनतेला दिसत आहे. सुशांत प्रकरणीही आम्हांला ओढण्याचा प्रयत्न आहे. तोदेखील अकार्यक्षम कारभारावरून लक्ष हटवण्यासाठीच आहे. आम्हांला सध्या कोरोनाविरुद्धची लढाई महत्त्वाची आहे.अलमट्टीप्रश्नी आता महाराष्ट्राने खंबीर भूमिका घ्यावी. आम्ही त्यांच्यासमवेत आहोत; कारण उंची वाढवल्यामुळे काय परिणाम होतील हे आपल्याला गेल्यावर्षीच कळून चुकले आहे, असेही ते म्हणाले.लढाई मोदींशी नाही, कोरोनाशी आहेबिगरभाजप मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी यांचे नाव न घेता, ह्यलढायचं की नाही हे एकदा ठरवा,ह्ण असे विधान केले होते. याबाबत विचारण केली असता फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या हे कोणीतरी लक्षात आणून दिले पाहिजे की, आपली लढाई कोरोनाशी सुरू आहे. ती नीट लढली पाहिजे. लढाई मोदी यांच्याशी नाही.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूर