शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मारेकºयांचा शोध लावा, यामागील खरे सूत्रधार पकडावे, -‘निर्भय वॉक’ रंकाळा परिसरात-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 16:44 IST

‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे अमर रहे.., खुन्यांना पाठीशी घालणाऱ्या शासनाचा धिक्कार असो.., खुनी सनातनी...चले जाव’ अशा घोषणांनी मंगळवारी सकाळी रंकाळा परिसर दणाणून गेला.

ठळक मुद्दे२० डिसेंबर रोजी सकाळी संघर्ष समितीच्यावतीने निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन

कोल्हापूर : ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे अमर रहे.., खुन्यांना पाठीशी घालणाऱ्या शासनाचा धिक्कार असो.., खुनी सनातनी...चले जाव’ अशा घोषणांनी मंगळवारी सकाळी रंकाळा परिसर दणाणून गेला. निमित्त होते शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्यावतीने रंकाळा परिसरात काढण्यात आलेल्या निर्भय मॉर्निंग वॉकचे.ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकºयांचा शोध लावा, यामागील खरे सूत्रधार पकडावे, या मागणीसाठी या ‘मॉर्निंग वॉक’चे आयोजन करण्यात आले होते.

संध्यामठ घाट येथून मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली. रंकाळा टॉवर, रंकाळा उद्यान यामार्गे पुन्हा संध्यामठ घाट येथे मॉर्निंग वॉकची सांगता झाली. यावेळी प्रकाश हिरेमठ यांनी ‘मारली तू गोळी...’ हे गीत सादर केले. यावेळी बी. एल. बरगे, संभाजीराव जगदाळे, वसंतराव पाटील, अनिल चव्हाण, दिलीप पवार, मेघा पानसरे, सुनंदा चव्हाण, बिजली कांबळे, वंदना पाटील, विजया पाटील, बाबूराव लाटकर, माणिक यादव, हसन देसाई, प्रा. सुभाष जाधव, विनोदसिंह पाटील, सुभाष सावंत, बंडू माने, अ‍ॅड. अजित चव्हाण, सतीश पाटील, सतीशचंद्र कांबळे, अशोक भोईटे, अजय अकोळकर, अजित कुलकर्णी, आनंदराव चौगले, अरुण पाटील, रमेश वडणगेकर, विकास जाधव, आदी उपस्थित होते. गंजी गल्ली बिंदू चौक येथून गंजी गल्ली परिसरात २० डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता संघर्ष समितीच्यावतीने निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर