शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

जिल्ह्यात मोबाईल अ‍ॅपद्वारे आर्थिक गणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 14:49 IST

देशाची सातवी आर्थिक गणना केंद्र सरकारने हाती घेतली आहे. या माहिती संकलनात व विश्लेषणात सुलभता यावी म्हणून कोल्हापुरात मोबाईल अ‍ॅपद्वारे गणनेचे काम सुरू झाले आहे. फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात आतापर्यंत २१ हजार आस्थापनांतील कुटुंबांची गणना पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात मोबाईल अ‍ॅपद्वारे आर्थिक गणनासातवी राष्ट्रीय गणना सुरू : फेब्रुवारीपर्यंत काम चालणार

कोल्हापूर : देशाची सातवी आर्थिक गणना केंद्र सरकारने हाती घेतली आहे. या माहिती संकलनात व विश्लेषणात सुलभता यावी म्हणून कोल्हापुरात मोबाईल अ‍ॅपद्वारे गणनेचे काम सुरू झाले आहे. फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात आतापर्यंत २१ हजार आस्थापनांतील कुटुंबांची गणना पूर्ण झाली आहे.रोजगारविषयक विश्वासार्ह आकडेवारीसाठी अत्यंत उपयुक्त ऐवज म्हणून या गणनेचा वापर केला जातो. निती आयोगाचे धोरण व नियंत्रणाखाली हे काम केले जाते. यापूर्वीची गणना २०१३ मध्ये झाली होती. आता २६ नोव्हेंबरपासून याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती केली गेली आहे.

प्र्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन माहिती घेण्याचे काम या महिनाअखेरपर्यंत, तर पूर्ण विश्लेषणासह अंतिम आकडेवारी फेब्रुवारीअखेरपर्यंत तयार करण्याच्या सूचना जिल्हा सांख्यिकी विभागाकडून देण्यात आल्या आहेत. या माहितीचे अधिक सुलभपणे संकलन व विश्लेषण करता यावे म्हणून स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.

मोबाईलमधील या अ‍ॅपद्वारे आस्थापना व त्यांच्या संबंधित कुटुंबांकडून माहिती संकलित केली जात आहे. या गणनेच्या निमित्ताने केलेल्या माहिती संकलनातून राष्ट्रीय व्यवसाय नोंदवही तयार केली जाणार आहे. याद्वारे रोजगाराविषयी भविष्यातील नियोजन सोपे होणार आहे.कोणाची होणार गणना...सर्व बिगर कृषी आर्थिक कार्यालयांतील आस्थापनांमध्ये कार्यरत सर्व कुटुंबे व आस्थापनाबारमाही, हंगामी, नैमित्तिक क्षेत्रांत काम करणारे कामगार.२०१३ मधील गणना दृष्टिक्षेपात

  • जिल्ह्यात ५.७१ लाख आस्थापनांची नोंद
  • रोजगाराच्या बाबतीत कोल्हापूर राज्यात चौथ्या स्थानी
  • महिला उद्योजकांचा वाटा १५.०७ टक्क्यांवर
  • हस्तव्यवसाय, हातमाग क्षेत्रात ११.३३ टक्के इतका वाटा
  • कृषिक्षेत्रावर आधारित उद्योगामध्ये २०.४८ टक्के लोक
  • पशुधनावर आधारित उद्योगात ३.१८ लाख लोक
  • बिगर कृषी क्षेत्र आस्थापनेत मुंबई, ठाणे, पुण्यानंतर कोल्हापूरचा क्रमांक

एमएसएमई डेव्हलपमेंट अ‍ॅक्टअंतर्गत सर्व आस्थापनांची सर्वंकष माहिती गोळा करून तिचे जिओ टॅगिंगद्वारे गाव, तालुका, जिल्हा पातळीवर वर्गीकरण केले जाणार आहे. त्यासाठी १११२ प्रगणक व ५८८ पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. अजूनही १११४ प्रगणकांची कमतरता जाणवत आहे. त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.- भूषण देशपांडे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी

 

टॅग्स :MobileमोबाइलEconomyअर्थव्यवस्थाkolhapurकोल्हापूर