शहरातील कुंभारवाड्यातील रिंगरोड लगत ईरशाद पापालाल नदाफ यांचा गादी, सोफा सेट व कोचिंग करण्याचा कारखाना आहे. चार दिवसापूर्वी शॉर्टसर्किटने कारखान्यात आग लागून कारखान्यातील तयार केलेल्या गाद्या, खुर्च्या, बेडशीटचे कापड, कापूस पिंजण्याचे मशीन, ५ एच. पी. मोटर व शेड असे मिळून सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले आहे.
कोरोना महामारीत आगीने ही नदाफ कुटुंबीयावर आघात केल्याने उदरनिर्वाहाचा मुख्य स्त्रोतच नाहीसा झाल्याने खचलेल्या कुटुंबाला समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे..
यावेळी नगरसेवक हारूण सय्यद, मौलाना फहीम मुल्ला, आशपाक मकानदार, कबीर मुल्ला, मौलाना अजिम पटेल, इकबाल शायन्नावर, शकील जमादार, जमीर नदाफ, जावेद गवंडी, फिरोज मकानदार आदी उपस्थित होते.
---------------------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे गादी व्यावसायिक ईरशाद नदाफ यांना आर्थिक मदत देताना मुस्लिम बांधव. यावेळी नगरसेवक हारूण सय्यद, आशपाक मकानदार, इकबाल शायन्नावर, फहीम मुल्ला आदी उपस्थित होते. (मज्जीद किल्लेदार)
क्रमांक : १९०५२०२१-गड-०३