शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

फायनान्स कंपन्यांवर कारवाई झालीच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 11:19 IST

फायनान्स कंपन्यांच्या अन्यायी कर्जवसुलीला स्थगिती आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी  ‘आरपीआय’च्या महिला आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कंपन्यांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

ठळक मुद्देफायनान्स कंपन्यांवर कारवाई झालीच पाहिजे‘आरपीआय’च्या महिला आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर : फायनान्स कंपन्यांच्या अन्यायी कर्जवसुलीला स्थगिती आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी  ‘आरपीआय’च्या महिला आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कंपन्यांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.‘आरपीआय’च्या महिला आघाडी अध्यक्ष रूपा वायदंडे, प्रा. शहाजी कांबळे, संजय जिरगे, कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी टाऊन हॉल येथून मोर्चाला सुरुवात झाली. सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार टॉकीजमार्गे असेंब्ली मार्गावरून आलेला मोर्चा दुपारी महावीर गार्डनसमोर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकला. येथेच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले.यावेळी बोलताना शहाजी कांबळे यांनी मायक्रो फायनान्स कंपनीच्या अन्यायी व्याज आकारणीमुळे, बेकायदेशीर कर्जवाटपामुळे आणि वसुलीवेळी होणाऱ्या दडपशाहीमुळे बचतगटातील कर्जदार महिलांचे जगणे अवघड बनले आहे. यांना या कंपन्यांच्या जाचातून बाहेर काढावेच लागणार आहे, अन्यथा येथून पुढील आंदोलनाचा टप्पाही तीव्र स्वरूपाचा असेल, असे जाहीर केले.

संजय जिरगे यांनी महिलांना कर्जमुक्त आणि भयमुक्त करण्यासाठी हा लढा तीव्र करूया, असे आवाहन केले. रूपा वायदंडे यांनीही महिलांचे शोषण करणाऱ्या या कंपन्यांची मनमानी येथून पुढे खपवून घेणार नसल्याचे सांगितले. मोर्चात रूपाली कांबळे, संभाजी पाटील, पुष्पा नलवडे, मुमताज नदाफ, सुरेखा पाटील, सतीश चांदणे, विलास टिपुगडे, बबलू अत्तार यांच्यासह बचतगटातील महिलांनी सहभाग घेतला.

 

 

टॅग्स :Morchaमोर्चाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर