शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अखेर कोल्हापूरात लॉकडाऊन शिधिल केल्याची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 22:42 IST

कोल्हापूरात लॉकडाऊन शिधिल केल्याची घोषणा आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाने केली.

ठळक मुद्देअखेर कोल्हापूरात लॉकडाऊन शिधिल हे नियम पाळावे लागनार

कोल्हापूर  अखेर कोल्हापूरात लॉकडाऊन शिधिल केल्याची घोषणा आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाने केली, मात्र, काही नियम कोल्हापूरकराना पाळावे लागनार आहेत,दि

नांक २७ जुलै पासून ३१ जुलै पर्यंत प्रतिबंधित आदेशाची मुदत वाढविण्यात येत असली तरी यामध्ये काही बाबींना सूट देण्यात आली आहे. व्यापारी आस्थापना सकाळी ९ वा. ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहतील. 

परंतु सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेतील कर्मचारी प्रती दिन जास्तीत जास्त ५० टक्के पर्यंत पाळी-पाळीने उपस्थित असतील असे नियोजन करावे. त्याच प्रमाणे सूट दिलेल्या सर्व बाबींच्या सेवा व आस्थापना, दुकाने, उद्योगधंदे, व्यापार इ. ठिकाणी आस्थापना मालक, कर्मचारी किंवा ग्राहक म्हणून ६० वर्षे किंवा वरील व्यक्तींना वावर करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.

अत्यावश्यक सेवेतील वाहने व प्रवासी वगळून उर्वरित सर्व कोल्हापूर जिल्ह्यात येणारी व जिल्ह्याबाहेर जाण्यास प्रवासी व वाहनांना तसेच लग्न, साखरपुडा, मुंज, वाढदिवस इ. कार्यक्रमांना बंदी असेल. बंदी आदेशातून सूट दिलेल्या बाबी व सेवांसाठी नागरिकांना सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत जिल्हा अंतर्गत खासगी आस्थापनांमध्ये जाता येईल. बंदी आदेशाच्या कालावधीत माल वाहतूक व वैद्यकीय साधने व तातडी सोडून उर्वरीत सर्व प्रकारची वाहने व नागरिकांच्या जिल्ह्या बाहेरील प्रवासास बंदी असेल.

कोल्हापूर जिल्ह्याच्या नजीकच्या जिल्ह्यात प्रवासासाठी देण्यात आलेले दैनंदिन प्रवासी परवाने वैद्यकीय व अत्यावश्यक कर्मचारी वगळून स्थगित ठेवण्यात येत आहेत. बंदी आदेशाच्या कालावधीत सूट दिलेल्या बाबी वगळून दुकाने, व्यापारी आस्थापना, सेवा इ. कारणांसाठी एका ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींचा समुह एकत्र येण्यास बंदी असेल.

त्याच प्रमाणे सूट दिलेल्या सर्व बाबींच्या सेवा व आस्थापना, दुकाने, उद्योगधंदे, व्यापार इ. ठिकाणी आस्थापना मालक, कर्मचारी किंवा ग्राहक म्हणुन ६० वर्षे किंवा वरील व्यक्तींना वावर करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. परंतु यातुन वैद्यकीय आस्थापनेस सेवा देणाऱ्या व्यक्ती, वैद्यकीय उपचारासाठी बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना सूट असेल.

सूट वगळता सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, मनोरंजन व सामाजिक कार्यक्रम, सभा, मोर्चे, आंदोलने इ. साठी पूर्णत: बंदी असेल. अत्यावश्यक व तातडीच्या वेळी मात्र, नागरिकांना इतर वेळी अत्यावश्यक बाबी व सेवा घेता येतील.       सूटदेण्यातआलेल्याबाबी

अ) अत्यावश्यक सेवा व आस्थापना.1) सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशूचिकित्सा सेवा, औषध सेवा, हॉस्पीटल संलग्न सेवा देणाऱ्या आस्थापना.2) सर्व बँक, बँक एटीएम, कॅश रीप्लेनिशिंग एजन्सी (CRA), इन्शुरन्स ऑफिस, वित्त पुरवठा आस्थापना, पोस्ट ऑफिस, पेट्रोल / डिझेल पंप सुरु राहतील.3) मा. न्यायालये व अत्यावश्यक सेवेतील राज्य व केंद्र सरकारी कार्यालये कमीत कमी अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीत सुरु राहतील.                             4) दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके, यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल/प्रिंटमिडिया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरु राहतील.5) सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी, ॲम्ब्युलन्स व इतर वैद्यकीय बाबींशी संबंधीत व्यक्तींचा प्रवास व वाहतुकीसाठी परवानगी राहील. त्यासाठी वेगळा पास अथवा परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.6) वृध्द व आजारी व्यक्तीकरिता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सुरु राहतील.

ब) जीवनावश्यक सेवा व आस्थापना.1) दूध संकलन व वाहतूक सुरु राहील. (वेळेची मर्यादा नाही).2) किरकोळ दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण, भाजीपाला व फळे विक्री सकाळी 6 ते सा 6 वा. पर्यंत सुरु राहील.3) व्यापारी आस्थापना सकाळी 9 वा. ते सायंकाळी 6 वा पर्यंत सुरु राहतील. परंतु सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांचे आस्थापनेतील कर्मचारी प्रती दिन जास्तीत जास्त 50% पर्यंत पाळी-पाळीने उपस्थित असतील असे नियोजन करावे. (मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस, रेस्टॉरंटस्, केशकर्तनालये, ब्युटीपार्लर्स, सलून्स, स्पा, मसाज सेंटर, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्कस्, प्रेक्षागृहे, बार आणि सभागृहे, असेंब्ली हॉल इ. वगळून). मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील किराणा-धान्य विक्री व अत्यावश्यक वस्तु विक्री व सेवा सुरु राहतील.4) एलपीजी गॅस घरपोच वितरण करणाऱ्या आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 6 वा. पर्यंत.सुरु राहतील.5) ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या आस्थापना व सेवा सुरु राहतील.6) दुरध्वनी, इंटरनेट व बँक एटीएम संबंधीत आस्थापना सुरु राहतील

7) शिव भोजन योजना व वंदे भारत योजनेंतर्गत कोविड-19 करिता वापरात असलेले हॉटेल, डॉक्टर्स, स्टाफ, नर्स व संस्थात्मक अलगीकरण / विलगीकरणा साठी घेतलेले हॉटेल, लॉज व इतर इमारती सूरु राहतील. त्याच प्रमाणे ज्या लॉजेस किंवा निवारागृहामध्ये सध्या प्रवासी / कर्मचारी वास्तव्यास आहेत, त्यांचेसाठी अशी लॉजेस व निवारागृहे व त्यातील खाद्यगृहे अशा प्रवाशांपुरत्या मर्यादित स्वरुपात सुरु राहतील.

क) उद्योगधंदे1) कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी भागातील सर्व उद्योगधंदे 50% कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.  त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान आस्थापना 50 % कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.2) ग्रामीण भागातील एमआयडीसी किंवा खासगी किंवा सहकारी औद्योगिक वसाहतीतील सर्व औद्योगिक आस्थापना तसेच अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान आस्थापना 50% कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.

अशा आस्थापनांनी त्यांची कर्मचारी क्षमता प्रादेशिक अधिकारी, म.औ.वि.मं. / जिल्हा उद्योग अधिकारी (DIC) / सहाय्यक कामगार आयुक्त यांचेकडून प्रमाणित करुन घ्यावी. या आस्थापनेमधील सर्व अधिकारी / कर्मचारी /कामगार यांनी त्यांचे ओळखपत्र व उद्योग विभागातील संबंधीत अधिकारी यांनी प्रमाणित केलेले आस्थापनेचे पत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील.ड) ग्रामीण भागातील शेतीची कामे.इ) इतर1) अंत्यसंस्कार / अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त 10 नातेवाईक / नागरिक यांना हजर राहता येईल. मृत व्यक्तींच्या नजीकच्या व्यक्तींचे सांत्वन शक्यतो दूरध्वनीवर करण्याबाबत सुचित करण्यात येत आहे.2) माल वाहतूक.3) शैक्षणिक संस्थांची फक्त शिक्षणेत्तर / कार्यालयीन कामे कमीत कमी कर्मचाऱ्यांचे उपस्थितीत सुरु राहतील.ई) प्रवासी वाहने - खासगी दुचाकी (फक्त चालक), चार चाकी वाहने (चालक + दोन प्रवासी) व शहरांतर्गत ऑटो रिक्षा (चालक + दोन प्रवासी). कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेशाप्रमाणे अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व प्रकारच्या आस्थापना बंद राहतील. उपविभागीय दंडधिकाऱ्यांचे प्रत्येक प्रतिबंधात्मक आदेश त्या क्षेत्रातील सर्वांवर बंधनकारक असतील.

बंदीआदेशातुन सुट दिलेल्या सर्व सेवा व आस्थापनामध्ये वावरणाऱ्या सर्व व्यक्तींनी पूर्ण वेळ मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर इ. बंधने पाळणे आवश्यक आहे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर