शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटाच्या आमिषाने फसवणुकीचा संशय

By admin | Updated: June 23, 2017 01:13 IST

तरुणाला मारहाण : चित्रपट महामंडळाची पोलिसांत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने परदेशात मुलींची विक्री होत असल्याचा संशय व्यक्त करीत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी, सदस्यांसह जमावाने एका तरुणाला बेदम चोप देत शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणले. ही घटना न्यू शाहूपुरीतील एका हॉटेलमध्ये गुरुवारी दुपारी घडली. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. याबाबत अधिक माहिती अशी, न्यू शाहूपुरीतील एका हॉटेलमध्ये संबंधित तरुण चार दिवसांपूर्वी आला. त्याने शहरातील विविध नृत्यवर्गांशी संपर्क साधला. आपल्याला चित्रपटाच्या आॅडिशनसाठी मुली पाहिजेत, असे सांगितले. त्यामुळे शहरातील काही नृत्यवर्गांच्या एक-दोन मुली या हॉटेलमध्ये या तरुणाला भेटण्यासाठी आल्या. दरम्यान, कोल्हापुरातील निर्माते अमोल कोळेकर यांच्याशी त्याची ओळख झाली. कोळेकर यांना त्याचा संशय आला. दोन दिवस कोळेकर यांनी त्याच्या हालचालींवर ‘लक्ष’ ठेवले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी हा प्रकार गुरुवारी सकाळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकारी, सदस्यांना कार्यालयात जाऊन सांगितला. त्यानुसार दुपारी महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर, कार्यवाह रणजित जाधव, शुभांगी साळोखे, सागर टिळके, भाऊ पाटील, अमर मोरे, आदी या हॉटेलमध्ये या तरुणाला जाब विचारण्यासाठी आले. त्यावेळी दोन मुली आॅडिशनसाठी येथे आल्या होत्या. थेट जमावाने या तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ गोंधळ उडून वातावरण तणावपूर्ण बनले. त्यांनी या तरुणाला वाहनामधून शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.कोट : मुला-मुलींच्य्या आॅडिशनसाठी पालकवर्गाने स्वत: त्याठिकाणी जावे. हा प्रकार बदनामी करणारा आहे. त्यामुळे आम्ही जागरूक होऊन याचा पर्दाफाश केला.- मिलिंद अष्टेकर, माजी उपाध्यक्ष, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ, कोल्हापूर.तीन वेगवेगळे पत्ते...चित्रपट आॅडिशनसाठी ५ ते ७ जुलै या कालावधीत ३० रूम बुक केल्याची चर्चा यावेळी सुरू होती. त्याचबरोबर त्याने आपल्या व्हिजिटिंग कार्डवर बंगलोर येथील पत्ता दिला आहे. इंटरनेटवरून त्याच्यासंबंधी माहिती घेतली असता त्याचा इंदोर, पुणे, बंगलोर असे पत्ते आढळले.