शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या देशी लघुपटाला फिल्मफेअरचे नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 16:25 IST

कोल्हापूरातील स्थानिक कलावंतासोबत नामांकित अभिनेत्री असलेल्या देशी या लघुपटाला फिल्मफेअरच्या लघुपट स्पर्धेत नामांकन मिळालेले आहे. या लघुपटाने पदार्पणातच सांगलीच्या आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात सात पारितोषिके मिळविली आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या देशी लघुपटाला फिल्मफेअरचे नामांकनस्थानिक कलावंतांचा समावेश : सांगली फेस्टिव्हलमध्ये सात पारितोषिके

कोल्हापूर : कोल्हापूरातील स्थानिक कलावंतासोबत नामांकित अभिनेत्री असलेल्या देशी या लघुपटाला फिल्मफेअरच्या लघुपट स्पर्धेत नामांकन मिळालेले आहे. या लघुपटाने पदार्पणातच सांगलीच्या आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात सात पारितोषिके मिळविली आहेत.चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ प्रस्तुत या लघुपटाची निर्मिती राजेंद्रकुमार मोरे यांनी केली आहे. या लघुपटात वीणा जामकर यांनी नायिकेची भूमिका केली असून इतर सर्व कलाकार तसेच तंत्रज्ञ हे स्थानिक आहेत.देशी लघुपटातून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेच्या मुलीला शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी येणाºया अडचणींचा विषय मांडण्यात आला आहे. या लघुपटाची कथा मनाला स्पर्शून जाणारी असून प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा सामाजिक संदेश यातून दिला आहे.सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराज एंटर्टेनमेंट, रिटच प्रॉडक्शन प्रस्तुत, आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवामध्ये उत्कृष्ट लघुपट : देशी (प्रथम), उत्कृष्ट दिग्दर्शक : रोहित बापू कांबळे (प्रथम), उत्कृष्ट अभिनेत्री : वीणा जामकर (प्रथम), उत्कृष्ट बाल कलाकार : गार्गी नाईक (द्वितीय), उत्कृष्ट छायांकन: जयदिप निगवेकर (प्रथम), उत्कृष्ट संगीतकार : डॉ. जयभिम शिंदे (प्रथम)आणि उत्कृष्ट संकलन: शेखर गुरव (तृतीय) अशीे तब्बल सात पारितोषिके या लघुपटाने पटकाविली.फिल्मफेअरच्या शॉर्ट फिल्म अ‍ॅवार्डस २0२0 च्या स्पर्धेत सामाजिक जागृती या गटात देशी लघुपटाची निवड झाली असून सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट फिक्शन चित्रपट, सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन चित्रपट आणि प्रेक्षक पसंती पुरस्कारासाठी या लघुपटाला नामांकन मिळालेले आहे. प्रेक्षक पसंती पुरस्कारासाठी देशी लघुपटाला आॅनलाईन मतदान करण्याचे आवाहन दिग्दर्शक रोहित बापू कांबळे यांनी केले आहे.या लघुपटाचा प्रीमिअर कोल्हापूरात गेल्या आठवड्यात अभिनेत्री वीणा जामकर यांच्या उपस्थितीत झाला होता. 

 

टॅग्स :Short Filmsशॉर्ट फिल्मkolhapurकोल्हापूरFilmfare Awardफिल्मफेअर अवॉर्ड