शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

अजरामर कलाकृतीने प्रेक्षक भारावले..!

By admin | Updated: July 23, 2016 00:53 IST

जयराम शिलेदार जन्मशताब्दी : लोकशाहीर राम जोशी चित्रपटाचे सादरीकरण

कोल्हापूर : प्रतिभावंत शाहिराचा भरभराटीचा काळ आणि नंतरची परवड यावर आधारित व्ही. शांताराम आणि बाबूराव पेंटर यांनी ७० वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेल्या ‘लोकशाहीर राम जोशी’ या अजरामर कलाकृतीच्या रसास्वादाने प्रेक्षक भारावले.गंधर्वभूषण जयराम शिलेदार जन्मशताब्दीनिमित्त कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व गायन समाज देवल क्लबतर्फे शुक्रवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे या चित्रपटाचे सादरीकरण झाले. ‘लोकरंजनाशिवाय लोकशिक्षण होणे नाही’ अशा धारणेतून काव्याला रूढीपरंपरांच्या जोखडातून मुक्त करू पाहणाऱ्या राम जोशी या परखड बाण्याच्या कवीची भूमिका जयराम शिलेदार यांनी उत्तमरीत्या साकारली. १९४७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना कृष्णधवल दुनियेची सफर घडविली. ‘सुंदरा मनामध्ये भरली... हवेलीत शिरली’ या प्रसिद्ध लावणीसह संगीत, संवाद, कथा या सर्व आघाड्यांवरील कामगिरीने प्रेक्षक खिळून राहिले. चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही. शांताराम व बाबूराव पेंटर यांनी केले होते, तर कथा व संवाद ग. दि. माडगूळकर यांचे होते. राम जोशी यांच्या पदांना वसंत देसाई यांनी संगीत दिले होते. जयराम शिलेदार यांच्यासह हंसा वाडकर, शकुंतला, परशुराम, सुधा आपटे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. सुरुवातीला चंद्रकांत जोशी यांनी ‘लोकशाहीर राम जोशी’ या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेसंदर्भातील माहिती सांगितली. (प्रतिनिधी)चित्रपटाच्या सादरीकरणापूर्वी कीर्ती शिलेदार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जयराम शिलेदार यांच्या नाट्य व चित्रपट क्षेत्रांतील जीवनप्रवासावर आधारित ‘आनंदयात्री’ हा २० मिनिटे कालावधीचा माहितीपट दाखविण्यात आला. निवेदक म्हणून अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा आवाज लाभला आहे.छायाचित्र प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवसजयराम शिलेदार यांचा नाट्य, चित्रपटसृष्टीतील कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडणाऱ्या कृष्णधवल, रंगीत छायाचित्रांचे प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक येथील कलादालनात भरविण्यात आले आहे. रामराज्यवियोग, सूत्रधार नट, स्वयंवर, बाजीराव मस्तानी, मृच्छकटिक, महाकवी कालिदास, विद्याहरण, अमरकीर्ती, भावबंधन, आदी संगीत नाटकांतील छायाचित्रांचा प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे. हे प्रदर्शन आज, शनिवार सकाळी नऊ ते रात्री आठ या कालावधीत रसिकांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले आहे. तरी कलारसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.