पन्हाळा : सातार्डे गावामध्ये शेतकरी दाम्पत्याला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी रंगराव नारायण नाईक, दाजी बळवंत पोवार, बाजीराव कृष्णात पोवार, भीमराव शामराव पोवार (रा. मरळी) या चौघांविरोधात पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा जातिवाचक गुन्हा दाखल झाला आहे. सुभाष बळीराम रामुगडे (माजी नगरसेवक) यांची सातार्डे येथे आठ एकर शेती आहे. याठिकाणी रामुगडे दाम्पत्य भुईमुगाची पेरणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी येथे रंगराव नाईक आणि इतर लोक आले. त्यांनी जातिवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की करत मारहाण केली. या वेळी शेजारील काही लोकांनी दाम्पत्याची सुटका केली.
सातार्डे गावात मारहाणप्रकरणी जातिवाचक गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST