शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
5
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
6
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
7
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
8
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
9
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
10
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
11
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
12
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
13
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
14
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
15
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
16
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
17
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
18
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
19
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत

अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा बँकेत झुंबड

By admin | Updated: April 9, 2015 01:05 IST

३९८ जणांचे ५३१ अर्ज : सतेज पाटील, ए. वाय. पाटील यांचे शक्तिप्रदर्शनाने अर्ज

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसाठी (केडीसीसी) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उमेदवार, सूचक, अनुमोदक व समर्थकांची जिल्हा बँकेच्या परिसरात झुंबड उडाली होती. परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. दरम्यान, सकाळी साडेअकराच्या सुमारास माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य ए. वाय. पाटील यांनी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केले. बुधवारी अखेरचा दिवस असल्यामुळे बँकेच्या तळमजल्यावर तालुका आणि गटनिहाय अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली होती. सकाळी ११ पासून अर्ज भरण्यासाठी रीघ लागली होती. उमेदवारासोबत आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात समर्थक व्यस्त होते. दोन दिवसांत अर्ज दाखल केलेल्या दिग्गजांनी बुधवारी पुन्हा अर्ज दाखल केले. माजी मंत्री पाटील व ए. वाय. पाटील यांचे कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शक्तिप्रदर्शन केले. समर्थक आणि उमेदवारांच्या चारचाकी वाहनांमुळे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत जिल्हा बँकेसमोरील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती. गटनिहाय दाखल महत्त्वाच्या उमेदवारांची नावे अशी -गट क्रमांक - १ : (विकास संस्था) आजरा - अशोक चराटी, अजित चराटी, अनिल देशपांडे, मुकुंद उर्फ उदयसिंह देसाई, सुधीर देसाई. भुदरगड - कल्याणराव निकम. चंदगड - सुरेशराव चव्हाण-पाटील, राजेश पाटील, नरसिंगराव पाटील, रामकृष्ण पाटील. गडहिंग्लज - बाबासाहेब आरबोळे, संतोष पाटील, जयकुमार मुन्नोळी, सचिन पाटील, बाबूराव पाटील, सोमगोंडा आरबोळे. गगनबावडा - सतेज पाटील, मानसिंग पाटील, बजरंग पाटील, पांडुरंग शिंदे. हातकणंगले - प्रदीप चौगुले, संजय मगदूम. कागल - दत्तात्रय वालावलकर, बाबासाहेब पाटील. करवीर - भगवानराव काटे, मनीषा पाटील. पन्हाळा - नीलेश उर्फ बाळासाहेब सरनाईक, दौलतराव पाटील, निपुण कोरे, अजित नरके, प्रकाश पाटील. राधानगरी - आनंदराव पाटील, शामराव भावके. शाहूवाडी - मानसिंगराव गायकवाड, सर्जेराव पाटील. शिरोळ - विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, अनिलकुमार यादव, राजेंद्र उर्फ भाऊसाहेब पाटील.गट क्रमांक २ (खरेदी विक्री / प्रक्रिया संस्था) प्रकाश आवाडे, संभाजी पाटील, हसन मुश्रीफ, अशोकराव माने, विजयसिंह माने, सत्यजित पाटील, अखिलेश घाटगे, विजयसिंह माने, राजेंद्र पाटील. गट क्रमांक ३ (अर्बन बॅँका / पतसंस्था) आनंदराव पाटील, सुनील पाटील, नीलेश सरनाईक, शेखर मंडलिक, संजय बडकडली, मुकुंद देसाई, सुधीर देसाई, अनिल पाटील.गट क्रमांक -४ (दूध, पाणी, गृहनिर्माण व इतर)भैया कुपेकर, धनाजीराव सरनोबत, सुरेश पाटील, आमदार हसन मुश्रीफ, माणिकराव पाटील (चुयेकर), बाळासाहेब सरनाईक, अरुण डोंगळे, रघुनाथ पाटील, सदाशिव नवणे, अजित नरके, गोविंद पाटील, संजय घाटगे, अमरीशसिंह घाटगे, संजय बटकडली, अशोक साळोखे, अमर उर्फ हंबीरराव पाटील, विश्वास पाटील, शशिकांत पाटील (चुयेकर), मुकुंदराव पोवार. महिला - माजी खासदार निवेदिता माने, अरुंधती जगदाळे, वेदांतिका माने, उदयानी साळुंखे, अंजना रेडेकर, सुजाता खानविलकर, सविता माने, भारती डोंगळे, सुनीता देसाई, सुयशा घाटगे, स्वाती कोरी, राजश्री मोरे.इतर मागासवर्गीय - असिफ फरास, श्रीनिवास सातपुते, सर्जेराव पाटील, सुनील मोदी, संजय बटकडली, विकास पाटील.अनुसूचित जाती - दत्तात्रय घाटगे, अशोकराव माने, दीपक भोसले, आमदार सुजित मिणचेकर, निवास कांबळे.भटक्या-विमुक्त - बाबूराव हजारे, रवींद्र जानकर, धनाजी खोत, स्मिता गवळी, परशराम तावरे