शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरवाडमध्ये पारंपरिक गटांतच लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:54 IST

अजित चंपुणावर ।लोकमत न्यूज नेटवर्कबुबनाळ : औरवाड (ता. शिरोळ) येथील सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी खुले असल्याने इच्छुकांच्या भाऊगर्दीत बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेचे केवळ बुडबुडेच आहेत. नुकतीच झालेली जिल्हा परिषदेची निवडणूक, त्यानंतर जात पडताळणीकडे झालेली तक्रार यांची किनार निवडणुकीला लाभली आहे. ही निवडणूक पक्ष, गटा-तटापेक्षा व्यक्तिगत पातळीवर प्रतिष्ठेची व लक्षवेधी चुरशीची ठरत असून, ...

अजित चंपुणावर ।लोकमत न्यूज नेटवर्कबुबनाळ : औरवाड (ता. शिरोळ) येथील सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी खुले असल्याने इच्छुकांच्या भाऊगर्दीत बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेचे केवळ बुडबुडेच आहेत. नुकतीच झालेली जिल्हा परिषदेची निवडणूक, त्यानंतर जात पडताळणीकडे झालेली तक्रार यांची किनार निवडणुकीला लाभली आहे. ही निवडणूक पक्ष, गटा-तटापेक्षा व्यक्तिगत पातळीवर प्रतिष्ठेची व लक्षवेधी चुरशीची ठरत असून, दुरंगी लढतीची चिन्हे दिसत आहेत.औरवाड येथील ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याने सत्तारूढ ग्रामपंचायत सदस्य दादेपाशा पटेल व विरोधी माजी उपसरपंच आशरफ पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या ग्रामपंचायतीवर जि. प. सदस्या परवीन पटेल यांची सत्ता आहे. मागील निवडणुकीत या गटाने ११ पैकी तीन बिनविरोधसह नऊ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले होते, तर विरोधी माजी उपसरपंच आशरफ पटेल गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते.गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी गटाने विविध विकासकामांतून गावाचा कायापालट केला आहे. त्याचबरोबर दर १२ वर्षांनी येणाºया कन्यागत महापर्वकालात बहुतांश मुस्लिम सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत सरपंचपद पूनम शिंदे यांना देऊन हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले. ही सत्ताधारी गटाची जमेची बाजू असल्याने निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.तर विरोधी आघाडीप्रमुख उपसरपंच आशरफ पटेल यांनीही आपले बंधू दिवंगत माजी जि. प. सदस्य शौकत पटेल यांच्या पश्चात सहकारी संस्थेतील राजकारणासह समाजकारणातून आपल्या गटाला उभारी दिली आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्याची जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.दरम्यान, ग्रा. पं. सदस्य दादेपाशा पटेल यांनी आपला यशस्वी राजकीय श्रीगणेशा विरोधी आशरफ पटेल यांच्या बालेकिल्ल्यातील प्रभागातून निवडून येऊन केला.त्यानंतर गेल्या पाच वर्षांत औरवाडचे राजकारण या दोघांभोवतीच केंद्रित झाले आहे. त्याचाच परिपाक म्हणजे नुकतीच पार पडलेली जिल्हा परिषदेची निवडणूक़ त्याचबरोबर जि. प. सदस्या परवीन पटेल यांच्याविरोधात आशरफ पटेल यांचे बंधू लायकअली पटेल यांनी जात पडताळणी कार्यालयाकडे जातीच्या दाखल्यासंदर्भात केलेली तक्रार होय.या दोन्ही वेळा दादेपाशा पटेल यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे या दोघांमध्येच राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्याचे पडसाद या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.गावचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच या दोघांमधील शिगेला पोहोचलेला राजकीय संघर्ष कमी व्हावा, यासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू होते. यामध्ये प्रामुख्याने विद्यमान सदस्य रामदास गावडे, प्रतापराव आगरे, जयवंत कोले, गोपाळ रावण, साबीर पटेल, बशीर पटेल, आदींचा समावेश होता.