शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

लढा हेच माझ्या आयुष्याचे खरे ‘टॉनिक’, पुन्हा सज्ज

By admin | Updated: February 8, 2015 00:50 IST

एन. डी. पाटील यांच्या भावना : हृदयशस्त्रक्रियेनंतर कोल्हापुरात घरी परतले, कार्यकर्त्यांकडून स्वागत

कोल्हापूर : अरे, रुग्णालयातून उपचार घेऊन मी परतलो; परंतु लढा हेच माझ्या आयुष्यातील खरे औषध आहे. त्यामुळे आजपासून कोणत्याही लढ्यासाठी मी पुन्हा सज्ज आहे... अशा भावना ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शनिवारी येथे कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्यक्त केल्या. प्रा. पाटील यांच्या आगमनाप्रीत्यर्थ लोकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. रुग्णालयातून उपचार करून घरी परतल्यावर एखाद्याचे अशा स्वरूपात स्वागत होण्याचा बहुधा हा पहिलाच प्रसंग असावा. मुंबईत हृदयशस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रा. पाटील यांचे दुपारी रुईकर कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी आगमन झाले. त्यांच्यासोबत पत्नी सरोज पाटील होत्या. निवासस्थानाजवळ टोलविरोधी कृती समितीसह समाजातील मान्यवरांनी व विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रा. पाटील यांचे अभीष्टचिंतन केले व त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी प्रा. पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘सातत्याने विविध प्रश्नांवर लढा हेच माझे टॉनिक आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी प्रकृतीचा असाच त्रास झाला. मी रायगड जिल्ह्यात ‘रिलायन्स’ने विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. ३४ हजार शेतकऱ्यांना जमिनी परत मिळवून दिल्या. त्यावेळी संघर्ष सुरू असताना माझे आजारपण पळून गेले. आताही तसेच आहे. आता मी ठणठणीत बरा आहे, काठी घेऊन चालताही येते. चळवळीत राहिलो तर तब्येत ठणठणीत राहते. टोल असो वा अन्य प्रश्नावर मी संघर्षास सज्ज आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तेच माझे संचित राहील.’ टोल समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे म्हणाले, ‘एन. डी. पाटील हे चळवळीतील नेते आहेत. टोल आंदोलनाचा ते कणा आहेत. त्यांना चांगले आरोग्य लाभो, हीच भावना आहे.’ माजी महापौर शिवाजीराव कदम, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, बाबासाहेब देवकर, संभाजी जगदाळे, दीपा पाटील, सत्यजित कदम, अशोक पोवार, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, लाला गायकवाड, श्रीकांत भोसले, व्यंकाप्पा भोसले, विवेक कोरडे, अशोकराव पवार-पाटील, बाळासाहेब वरुटे, बाबासाहेब देवकर, प्रा. अशोक चव्हाण, प्रा. सुभाष पाटील, दिलीपकुमार जाधव, दिगंबर लोहार, भारत पाटील, बजरंग शेलार, अरुण सोनाळकर, यांच्यासह कार्यकर्त्यांनी भेट घेतली.