शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास टक्के शिवार पाण्यापासून वंचित

By admin | Updated: April 8, 2017 00:46 IST

लाभक्षेत्रात कमतरता : तळवडे बांधाऱ्याचे बरगे सहा वर्षांपासून गायब

आर. एस. लाड ल्ल आंबाकडवी नदीवर आंबा ते मलकापूर दरम्यान तळवडे, हुंबवली, घोळलवडे, जावली, वाघमळा, खोतवाडी, सुतारवाडी, निळे, मलकापूर, कोपार्डे, शिरगाव येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांद्वारे पाणी अडवून लाभ क्षेत्रात सिंचन केले जात आहे. ‘हेड टू टेल’ या तत्त्वावर पाणीसाठा करणारे धोरण पाटबंधारे विभागाचे असले तरी नदीतील गाळ, झाडे-झुडुपे, तीव्र उन्हाळा तसेच शेतकऱ्यांची पाणी देणारी बेफिकिरी यामुळे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक शिवार शेतीच्या पाण्यापासून वंचित आहे. बंधाऱ्यांची गळती, गवताने आच्छादलेले पात्र यामुळे पाण्याचा साठा कमी होतो. तळवडे येथील बंधाऱ्याचे बरगे तर गेल्या सहा वर्षांपासून गायब आहेत.या नदीक्षेत्रातील मानोली, चांदोली, कासार्डे, पालेश्वर धरणात व कडवी मध्यम प्रकल्पात अडीच टीएमसी पाणीसाठा आहे. कडवी धरणावर दोन वर्षांपासून वीजनिर्मिती सुरू असल्याने येथील सिंचनासाठी पाणी कमी पडताना दिसते. मानोली धरणांतर्गत ६४0५ हेक्टर क्षेत्रापैकी ३३७३ हेक्टर, चांदोली धरणाखाली ४६८ हेक्टर पैकी २७२ हेक्टर, तर कासार्डे धरणाखालील ८४७ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ९0 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. पालेश्वर धरणाच्या ६१६0 हेक्टर क्षेत्रापौकी २४७३ हेक्टर क्षेत्र भिजते. उर्वरित ७६७२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणायचे असेल, तर नदीचे अस्तित्व जपणे आवश्यक आहे. नदीचे अस्तित्व जपताना पावसाचे पाणी साठविण्याची, जिरविण्याची गरज घोळसवडे ग्रामपंचायत सदस्य भास्कर कांबळे यांनी स्पष्ट केली. जेणेकरून धरण, नदी व बंधाऱ्यातील जिवंत झरे सातत्याने पाझरतील नि पाण्याची उपलब्धता होईल. कंपन्यांच्या रॉयल्टीच्या उत्पनातून विकासकडवी नदीचे धोकादायक चित्र समोर असताना सामाजिक विकासावरील खर्च कोठे होतो ? याचा जाब विचारणारी भूमिका शासनाने घेण्याची गरज आहे. बॉक्साईट उत्खननातील व गॅस कपंनीची कोट्यवधीची रॉयल्टी शासनाकडे जमा होते. त्या रॉयल्टीमधून नदीची स्वच्छता, गाळ काढणी व प्रदूषणमुक्तीची जागृती यावर निधी खर्चास प्राधान्याची गरज आहे.