शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

‘होम मिनिस्टर’साठी पतिराजांची ‘फिल्डिंग’

By admin | Updated: December 23, 2016 23:03 IST

काँग्रेस-शिवसेनेत सरळ लढत होणार : महिलासाठी राखीव असूनही इच्छुकांची संख्या मोठी; सर्वच इच्छुक मातब्बर

प्रकाश पाटील-- कोपार्डे --पूर्वीचा कोपार्डे व आताचा शिंगणापूर मतदारसंघ महिला खुला प्रवर्गासाठी राखीव असूनही इच्छुकांची मोठी संख्या आहे. या मतदारसंघामध्ये येणारे पंचायत समिती शिंगणापूर गण इतर मागास पुरुष व वाकरे गण इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असला तरी इच्छुकांनी आपली उमेदवारी नेत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. येथे काँग्रेस पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असून, याहीवेळी काँग्रेस व शिवसेना यांच्यातच सरळ लढतीचे चित्र आहे.करवीर मतदारसंघाचा गाभा म्हणून शिंगणापूर (कोपार्डे) मतदारसंघ ओळखला जातो. सर्वसाधारण ४० हजार लोकसंख्येचा हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्लाच राहिला आहे. या मतदारसंघावर असलेल्या काँग्रेसच्या वर्चस्वाला २०१२च्या निवडणुकीत सुरुंग लागला. यावेळी हा मतदारसंघ इतर मागाससाठी राखीव झाला. शिंगणापूर मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या दोन भागांत विभागला गेला आहे. भोगावती नदीच्या पूर्वेला शिंगणापूर, हणमंतवाडी (आता या मतदारसंघात हे गाव नाही) बालिंगा व पाडळी ही मोठ्या मतदारसंख्येची गावे असतानाही या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारीमुळे मतविभागणी झाली आणि शिवसेनेने आपला गठ्ठा मतदान विभागणार नाही यावर लक्ष केंद्रित केले. काँग्रेसचे उमेदवार सुरेश रांगोळकर यांना त्यांच्या गावातच शिवसेनेचे उमेदवार विलास पाटील यांच्यापेक्षा कमी मतदान मिळाले, तर नदीच्या पश्चिमेला असणाऱ्या वाकरे, कुडित्रे, कोपार्डे, आडूर, कळंबे, भामटे, चिंचवडे या गावांनी गेल्या दहा वर्षांत आपल्या गावांतील उमेदवार निवडला गेला नाही ही भावनिक लाट निर्माण झाली आणि विलास पाटील यांना भरभरून मतदान केल्याने साडेतीन हजार इतक्या मताधिक्याने विजय मिळाला व प्रथमच काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले. मतदारसंघ सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाला असून, काँग्रेसकडे उमेदवारांची रांग असून, शिवसेनेकडे अगदी हाताच्या बोटावर इच्छुक उमेदवार आहेत. काँग्रेसकडे मातब्बर उमेदवार आहेत. इच्छुकांनी आ. सतेज पाटील, पी. एन. पाटील यांच्या गाठीभेटी घेऊन फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. यात पाडळी खुर्द येथील डॉ. के. एन. पाटील यांनी पत्नी गीतांजली पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डी. आर. पाटील यांनी स्नुषा अ‍ॅड. रूपाली संग्राम पाटील (शिंगणापूर), यशवंत बँकेचे संस्थापक शंकरराव पाटील यांनी स्नुषा रसिका अमर पाटील (शिंगणापूर), ‘कुडित्रे’चे माजी सरपंच बाळ पाटील यांनी पत्नी योगिता पाटील यांच्यासाठी तसेच रूपाली बोंद्रे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. शिवसेनेकडून विद्यमान सदस्य विलास पाटील हे पत्नी कल्पना पाटील यांच्या, तर कुंभी-कासारी कारखान्याचे संचालक अनिल पाटील हे पत्नी शीतल पाटील (वाकरे) यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. शारदा वसंत पाटील (वाकरे) व कुडित्रेच्या वैष्णवी पाटील शिवसेनेतून, तर ‘स्वाभिमानी’कडून रूपाली बाजीराव देवाळकर इच्छुक आहेत.काँग्रेसमध्ये बंडखोरी? वाकरे पंचायत समिती गणासाठी भामटेचे माजी सरपंच सरदार पाटील शिवसेनेकडून, तर काँग्रेसकडून भगवान परीट, संजय कुंभार (वाकरे), महादेव तोडकर (वाकरे) इच्छुक आहेत. शिंगणापूर गणातून काँग्रेसकडून नागदेववाडीचे माजी सरपंच मंगेश गुरव पाटील, विश्वास कामिरे, विश्वास निगडे, बालिंगेचे उपसरपंच अजय भवड व अतुल बोंद्रे इच्छुक आहेत. सेनेतून मोहन पाटील (पाडळी खुर्द) यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.वैचारिक युती महत्त्वाची काँग्रेसला हा आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवायचा असेल, तर या मतदारसंघात सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांनी वैचारिक मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे. अन्यथा, या फुटीचा फायदा उठवीत मागील निवडणुकीत हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा मतदारसंघ शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतला.या मतदारसंघात विधानसभा व कुंभी-कासारी कारखाना निवडणुकीत काही गावात शिवसेनेच्या मतात घट झाल्याचे चित्र आहे. ज्या गावात मतदानात घट झाली आहे तेथे शिवसेनेच्या उमेदवारांना जिवाचे रान करावे लागणार आहे.शिवसेनेची ताकद विद्यमान जि. प. सदस्य व ‘कुंभी-कासारी’चे संचालक विलास पाटील, ‘कुंभी’चे संचालक अनिल पाटील, वाय. एम. कांबळे, अ‍ॅड. बाजीराव शेलार, आनंदराव पाटील, कुंभी बँकेचे संचालक प्रकाश देसाई, बळवंत पाटील, कुंभी-कासारी सह. साखर कारखाना, कुंभी बँक.काँग्रेसची ताकद यशवंत बँक एकमेव काँग्रेसकडे असून, बँकेचे संचालक व्ही. आर. पाटील, एकनाथ पाटील, भगवंत पाटील, बी. बी. पाटील, एम. एम. पाटील, उत्तम पवार हे यामध्ये या मतदारसंघात प्रतिनिधित्व करतात.जिल्हा परिषद (इतर मागास पुरुष)विलास पाटील (शिवसेना)१०,७९०सुरेश रांगोळकर (काँग्रेस)७५५१मोहन पाटील (राष्ट्रवादी)४४२०आर. जी. कुंभार (जनसुराज्य)६६४वाकरे पंचायत समिती (महिला खुला प्रवर्ग)छाया माने (शिवसेना)६१९०कमल पाटील (काँग्रेस)४७१३नीता पाटील (राष्ट्रवादी)५००संगीता पोवार - (अपक्ष)९६१शिंगणापूर पंचायत समिती (महिला मागास प्रवर्ग)दीपा आवळे (शिवसेना)४२४८गोकर्णी कांबळे (काँग्रेस)३९७४दीपाली धनवडे (राष्ट्रवादी)२१३३यशोदा चौगले (अपक्ष)६२१२०१४ विधानसभा निवडणुकीतील गावनिहाय मतदान पुढीलप्रमाणे शिंगणापूर - ४७००, नागदेववाडी - ३४००, बालिंगा - ३९००, पाडळी खुर्द - ४४००, वाकरे - ४६००, कुडित्रे - ३७००, कोपार्डे - ३४००, आडूर - १३४९, कळंबे - ११७२, भामटे - १९००, चिंचवडे - ९५०