शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मर्जीतील पोलीस अधिकाऱ्यांसाठी फिल्डिंग

By admin | Updated: May 15, 2015 23:37 IST

लवकरच बदल्यांचा धडाका : आमदार, मंत्र्यांच्या शिफारशीसह थेट मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

एकनाथ पाटील - कोल्हापूर --जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या ३० मेअखेर होणार आहेत. या बदल्यात एका यंत्रणेकडून आपल्या मर्जीतील अधिकारी ठरावीक पोलिस ठाण्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना काही आमदार व मंत्र्यांच्या शिफारशींचा खास प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये नवीन आठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सध्या कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे (करवीर), दिनकर मोहिते (जुना राजवाडा), धन्यकुमार गोडसे (लक्ष्मीपुरी) अरविंद चौधरी (शाहूपुरी), अनिल देशमुख (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा), संभाजी गायकवाड (गांधीनगर), साहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खुणे (शहर वाहतूक शाखा), अनिल तनपुरे (गोकुळ शिरगाव), आदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी गृहखात्याला विशेष यादी पाठविण्यात आली आहे. प्रस्ताव यादीमध्ये सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना पोलीस मुख्यालयात नियुक्ती देण्यात यावी, अशी शिफारसही करण्यात आली आहे. या बदल्यांच्या नाट्यमय घडामोडींमध्ये एका अधिकाऱ्याने आपले राजकीय वजन वापरून थेट दिल्लीतून बदली रद्द केल्याचे समजते. जिल्ह्याच्या जवळपास राहणाऱ्या पोलीस निरीक्षकांसह साहाय्यक पोलीस निरीक्षक राजकीय वजन वापरून दर तीन वर्षांनी जिल्ह्यांतर्गत बदल्या करून घेण्यामध्ये तरबेज असतात. दोन वर्षांपूर्वी गुन्हेगारी टोळ्यांनी वर्चस्व वादातून शहराला वेठीला धरले होते. काही लोकप्रतिनिधींच्या आश्रयाला हे गुन्हेगार असल्याने त्यांचा समाजात खुलेआम वावर असे. पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुंडगिरी मोडत अवैध व्यावसायिकांची पाळेमुळे मोडीत काढण्याचे आदेश दिले. त्यांच्या कारवाईमुळे दोन नंबरची संपूर्ण फळी डॉ. शर्मा यांच्या विरोधात गेली. त्यांच्या बदलीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली; परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यामुळे डॉ. शर्मा यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना बदलून आपल्या मर्जीतील अधिकारी आणण्यासाठी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविला आहे. जिल्हाअंतर्गत प्रशासकीय बदल्यांचे अधिकार शर्मा यांना असले तरी या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश थेट गृहखात्याकडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.