शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सण आला अन् पैसे अडकले, ग्राहक चिंतातूर; पी. एम. सी. बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 11:59 IST

दसऱ्याच्या तोंडावर रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅप. बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घातल्याने बँकेच्या सर्वसामान्यांना सणासाठी लागणारा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न पडला आहे.

ठळक मुद्देसण आला अन् पैसे अडकले, ग्राहक चिंतातूरपी. एम. सी. बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

कोल्हापूर : दसऱ्याच्या तोंडावर रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅप. बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घातल्याने बँकेच्या सर्वसामान्यांना सणासाठी लागणारा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न पडला आहे.आठवडाभरात दसरा, तर महिनाभरात दिवाळी हा मोठा सण येत आहे. या दोन सणांना हिंदु धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्याने बहुतांशी नागरिक या मुहूर्तावर सोने, चांदीसह काही ना काही वस्तू खरेदी करतात.

दीपावली सणाला तर प्रत्येक अख्या कुटुंबाला नवीन कपडे खरेदी, फराळ तयार केला जातो, तर दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरही नव्या वस्तू खरेदी केल्या जातात. वर्षभरात रिकरिंग, बचत, ठेव अशा स्वरूपात नागरिक पैसा साठवत असतात. या सणाच्या तोंडावर पी. एम. सी. बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्याने खातेदार असलेल्या नागरिकांचे तोंडचे पाणी पळाले आहे; त्यामुळे अनेक नागरिकांनी योजून ठेवलेल्या कार्य, खरेदी कशी करायची अशी चिंता लागून राहिली आहे.

अनेकांना वैद्यकीय कारणांसाठी लागणारा पैसा कसा उभा करायचा असा प्रश्न, तर दरवर्षी जीवन विमा भरण्यासाठी महिन्याला ठरावीक रक्कम बाजूला काढून ती बँकेच्या रिकरिंग ठेवमध्ये ठेवणाऱ्या ग्राहकांना आता विमा हफ्ता कसा भरायचा असा प्रश्न पडला आहे.

जरी सहा महिन्यांनी बँकेवरील निर्बंध उठले तरी आताच्या घडीला खर्च कसा भागवायचा असा प्रश्न अनेक खातेदारांना पडला आहे, अशी चर्चा शहरातील विविध शाखांच्या ग्राहकांमध्ये होती. सहा महिन्यांनंतर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध उठतील आणि परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा दिलासा बँकेचे कर्मचारी व अधिकारी ग्राहकांना देतानाचे चित्र बँकेच्या कोल्हापुरातील सर्व शाखांमध्ये दिसत होते.गेले दोन दिवस सहा महिन्यांत एक हजार रुपये ग्राहकांना दिले जायचे. त्यात गुरुवारपासून १0 हजार इतकी मर्यादा वाढविण्यात आल्याची चर्चा ग्राहकांमध्ये होती. विशेषत: महिला ग्राहकांच्या चेहऱ्यांवर चिंता अधिक दिसत होती.

बँकेची शाखा जवळ असल्याने गेले कित्येक वर्षे येथे व्यवहार करीत होतो; मात्र रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे खात्यातील पैसे अडकले; त्यामुळे व्यवसायाचे चक्र कसे फिरवायचे असा प्रश्न पडला आहे.डी. आर. करपे, हॉटेल व्यावसायिक

ग्राहकांसाठी भित्तिपत्रक- आपल्या ठेवी सुरक्षित आहेत, बचत खाते, चालू खातेवरून एक हजार रुपये काढता येतील. मुदतपूर्ती झालेल्या ठेवीचे नूतनीकरण करता येईल. लॉकरचा वापर करता येईल. पी. एम. सी. बँकेच्या कर्जाचे व रिकरिंगचे हफ्ते दिलेल्या एस. आय. नुसार जमा होतील. मुदत ठेवीवरील मासिक व त्रैमासिक व्याज खात्यावर जमा होईल. स्वत:च्या ठेवीवर कर्ज घेतले असल्यास ठेवी बंद करून त्याची रक्कम कर्जास वर्ग करता येईल. कर्ज खात्यांमध्ये रोखीने रक्कम स्वीकारण्यात येईल, अशा स्वरूपाचे भित्तिपत्रक बँकेच्या शाखांबाहेर लावण्यात आले आहे.

 

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकkolhapurकोल्हापूर