शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

लघुउद्योगात महिला बचत गटांची भरारी

By admin | Updated: January 9, 2017 00:23 IST

दोन वर्षांत उभारले दोन हजार उद्योग : ९९ टक्के कर्जाची परतफेड; आर्थिक सबलीकरण

इंदुमती गणेश ल्ल कोल्हापूरएक महिला शिकली की फक्त आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर आपल्या बरोबरीच्या महिलांनाही प्रगतीचा मार्ग दाखविते, हे सिद्ध केलंय कोल्हापुरातील महिला बचत गटांनी. ‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ ही म्हण खरी ठरवीत या गटांनी अवघ्या दोन वर्षांत २०१९ नवीन उद्योग उभारले आहेत. दुसरीकडे, या उद्योगांसाठी जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाची सरासरी ९९ टक्के इतकी परतफेड केली आहे. महिला सबलीकरणाच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) अंतर्गत २००० सालापासून स्वयंसाहाय्यता महिला बचतगटांची सुरुवात करण्यात आली. किमान दहा महिला अशी अट असलेल्या या गटांद्वारे पहिले सहा महिने अंतर्गत कर्जपुरवठा केला जातो. त्यानंतर त्यांना जिल्हा बँकेकडून ५० हजार रुपये, त्याची परतफेड केल्यानंतर एक लाख आणि त्यानंतर दोन लाख रुपये असा कर्जपुरवठा केला जातो. बँकेचा व्याजदर वर्षाला साडेचौदा टक्के असतो. मात्र गटांतर्गत त्याचे व्याज दोन टक्के इतके असते. सुरुवातीला गटातील महिला स्वत:च्या कुटुंबाच्या गरजा, मुलांचा शैक्षणिक खर्च, आरोग्य अशा कारणांसाठी कर्जाची रक्कम वापरतात. त्यानंतर पुढे वाढत जाणाऱ्या कर्जाच्या रकमेपासून घरगुती पद्धतीने लघुउद्योगांना सुरुवात केली जाते. गटाच्या माध्यमातून एकत्रितरीत्या नवा व्यवसाय करण्याचे प्रमाण अधिक आहे. यात गारमेंट, ब्यूटी पार्लर, दुकान, शॉपीज, भाजी-फळांची विक्री, स्वस्त धान्य दुकान, दूध व दुग्धजन्य पदार्थ, भाडेतत्त्वावर शेती अशा विविध उद्योगांचा समावेश आहे. अशा रीतीने सन २०१४-१५ आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षात २०१९ नवीन उद्योगांची उभारणी या गटांनी केली आहे. बँकिंग व्यवहारात अग्रेसर जिल्हा बँकेच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरअखेर ३६ हजार ९७० महिला बचत गट स्थापन झाले असून, त्यांपैकी २९ हजार ८६९ गटांना ८६९२.१९ लाख इतके कर्जवाटप करण्यात आले आहे. जिल्ह्णातील जवळपास ५ लाख ३७ हजार ७४२ बचत गट महिला सदस्या बँकेचे व्यवहार करीत आहेत. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसला आहे. काही यशोगाथा बेलवळे येथील भावेश्वरी महिला बचत गटातर्फे खत, बी-बियाणेकेंद्र चालविले जाते. शेळेवाडी येथील जयलक्ष्मी महिला बचत गटाकडून सामुदायिक शेती, दूध संस्था, ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर देणे, हे उद्योग केले जातात. शिरोली दुमाला येथील समृद्धी महिला बचतगट, सारथी महिला बचतगट, रोहिणी महिला बचत गट यांनी पुण्यातील मॉलमध्ये भाग घेतला होता. ‘नाबार्ड’अंतर्गत सर्व योजना बचत गटांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा बँक प्रयत्नशील असते.त्यांनी उभारलेल्या उद्योगांमुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या आहेत. - स्नेहल करंडे, महिला विकास अधिकारी