- हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र
प्रतिक्रिया
पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून बाकी आहे. आदी पुनर्वसन मगच धरण या शासनाच्या निर्णयाला डावलून धरणात पाणीसाठा केला आहे. पुनर्वसनाची जबाबदारी निश्चित करून त्याचा कालबद्ध कार्यक्रम द्यावा, इतकीच आमची न्याय मागणी आहे. पाणीपूजनाला आमचा विरोध नाही. - कॉ. संपत देसाई, धरणग्रस्त नेते.
------------------------
प्रतिक्रिया
उत्तूर-कडगाव परिसर सुजलाम्-सुफलाम् होणार उत्तूर विभागातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात यावा म्हणून बाबा कुपेकर यांनी तत्कालीन ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार प्रकल्पाचे काम सुरू केले. मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नामुळे प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे उत्तूर, कडगाव परिसर सुजलाम्, सुफलाम् होणार असल्याने मला मानसिक समाधान निश्चितच आहे.
संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार
प्रतिक्रिया
आंबेओहोळशी नाळ जुळली..!
१९९८ पासून संजय पाटील (किणी) प्रकल्पाचे ठेकेदार म्हणून काम पाहत आहे. गेली २२ वर्षे प्रकल्पग्रस्त व शासनाशी समन्वय आणि संवाद साधून प्रकल्पाचे काम चांगल्याप्रकारे पूर्ण केले आहे. आंबेओहोळ प्रकल्पाच्या मातीशी माझी नाळ जुळली आहे. प्रकल्पात पाणीसाठा झाल्याचा मला मनस्वी आनंद आहे. - संजय पाटील, किणी.
आर्दाळ (ता. आजरा) येथील आंबेओहोळ प्रकल्पात झालेला पाणीसाठा. क्रमांक : ०८०९२०२१-गड-०५