शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

वस्त्रनगरीचे अर्थचक्र अडखळण्याची भीती

By admin | Updated: August 13, 2015 00:12 IST

सायझिंग संपाबाबत समन्वयाची गरज : लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची आवश्यकता

घन:शाम कुंभार- यड्राव -सायझिंग कामगारांच्या बेमुदत संपामुळे वस्त्रनगरीचे अर्थचक्र मंदगतीने सुरू आहे. त्यावर अवलंबून असलेल्या यंत्रमागधारकांसह सर्व घटक हवालदिल झाले आहेत. याबाबत समन्वयाने लवकर तोडगा काढण्यासाठी शासनासह लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची आवश्यकता आहे; अन्यथा वस्त्रनगरीचे अर्थचक्र अडकण्याची भीती निर्माण झाली आहे.सुधारित किमान वेतन अंमलबजावणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगारांनी संपाचे हत्यार उचलले आहे. याकडे सायझिंग मालकांनी पाठ फिरवली आहे. या संपामुळे वीस-बावीस दिवसांपासून यंत्रमाग कारखान्यांना सूत बिमे मिळणे बंद होत आले असल्याने यंत्रमाग कारखाने बिमाअभावी बंद आहेत. त्याचा विपरित परिणाम यंत्रमाग कामगारांसह इतर अवलंबून असणाऱ्या घटकांवर होत आहे.सायझिंग कामगार किमान वेतनाबाबत कोणाचेही दुमत नाही. परंतु ही बाब न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयामध्ये जो निर्णय होईल तो सर्वमान्य असेल. परंतु सद्य:स्थितीत सायझिंगची चाके फिरल्यास वस्त्रोद्योगास गती मिळू शकते, अशी भावना यंत्रमागधारकांमध्ये आहे. यंत्रमाग कारखाने बिमांअभावी बंद आहेत. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेले यंत्रमागधारक पुन्हा आर्थिक अडचणीत ढकलला जात आहे. यंत्रमाग बंद असल्याने परप्रांतीय कामगारांना आपापल्या प्रांताकडे जाण्याचे वेध लागले आहेत. तर स्थानिक कामगारांना उचल देऊन त्यांना सांभाळण्याची जबाबदारी यंत्रमागधारकांवर आली आहे.सण, उत्सव समोर आल्यामुळे परप्रांतीय कामगार आपल्या भागाकडे गेल्यास तो सर्व सण, उत्सव, दीपावली करून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कामगारांअभावी यंत्रमाग व्यवसाय अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे यंत्रमागधारकांवरील आर्थिक बोजा वाढत जाणार आहे.इचलकरंजीतील उत्पादित होणारे केंब्रिक, पॉपलीन, मलमल, आदी कापड या संपामुळे बंद राहिल्यास त्याचा व्यापार भिवंडी, मालेगाव, राजस्थान, पाली आदीकडे जाऊ शकतो. हे संभाव्य धोके हा संप लांबल्यास निर्माण होऊ शकतात. यामुळे या संपात सायझिंग मालक व कामगार यांच्यामध्ये समन्वय होणे आवश्यक आहे.कारण सायझिंग म्हणजे वस्त्रोद्योगाचे उगमस्थान आहे. सायझिंग सुरू राहिल्यास वस्त्रोद्योगास पूरक ठरते, यासाठी शासनासह लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची आवश्यकता आहे; अन्यथा वस्त्रनगरीचे अर्थचक्र अडखळण्याची भीती निर्माण झाली आहे...इचलकरंजी वगळता मागणी नाहीवस्त्रोद्योग महाराष्ट्रामधील मालेगाव, भिवंडी, विटा, सोलापूर, माधवनगर या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात आहे. तेथील सायझिंग व यंत्रमाग व्यवसाय विनातक्रार सुरू आहेत. सायझिंग किमान वेतनासाठी इचलकरंजी वगळता कोठेही मागणी नसल्याची चर्चा यंत्रमागधारकांत आहे. इचलकरंजी शहरालगत असलेले यड्राव, तारदाळ, खोतवाडी, पार्वती औद्योगिक वसाहत परिसरामध्ये सुमारे सहाशे यंत्रमाग कारखाने असून, वीस हजार यंत्रमाग आहेत.