शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
6
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
7
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
8
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
9
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
10
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
11
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
12
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
13
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
14
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
15
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
16
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
17
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
18
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
19
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत

बिबट्याचे भय महिनाभरापासून कायम

By admin | Updated: September 11, 2014 23:17 IST

नरंदे, कुंभोज परिसर : वनविभाग मात्र संभ्रमात

कुंभोज : नरंदे (ता. हातकणंगले) पासून दानोळी (ता. शिरोळ) या गावांच्या दक्षिणेकडील बाजूच्या डोंगराच्या पायथ्याशी पसरलेल्या विस्तीर्ण ऊसपट्ट्यात सध्या बिबट्याचा वावर असल्याच्या भीतीने गेल्या महिनाभरापासून शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे. अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात शेळ्या-मेंढ्या तसेच घोडा जखमी होण्याच्या घटना घडूनही बिबट्याच्या पाऊलखुणा न मिळाल्याने वनविभागास याचे गांभीर्य नाही. मात्र, सहा महिन्यांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दानोळीच्या वाघमारे मळ्यातील लहान मुलगा ठार झाल्याच्या घटनेच्या स्मृती जाग्या झाल्या. कुंभोज, दानोळी, नेज, आदी परिसरातील शेतकरी शेतात-शिवारात भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.महिन्यापूर्वी नरंदेच्या वाझरा परिसरात शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर अज्ञात प्राण्याने हल्ला केल्याची घटना घडली. आणखी एका हल्ल्यात कुंभोजच्या विष्णू पुजारी यांचा घोडा जखमी झाला आहे. गेल्या आठवड्यात कवठेसार-दानोळी दरम्यान उसाच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाल्याचे शेतकरी सांगतात. काल दानोळीच्या दळवी मळ्यातील गीतांजली दळवी यांना बिबट्या दिसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांच्या मनातील बिबट्याची भीती आणखी गडद झाली. ज्या परिसरात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले, त्या ठिकाणी वनरक्षक आर. बी. मोरे, राऊत यांनी पाहणी केली असता अद्यापही बिबट्याच्या पाऊलखुणा मिळाल्या नसल्याने बिबट्या असल्याची पुष्टी वनविभाग देण्यास तयार नाही.२८ मे २००८ रोजी दानोळीच्या वाघमारे मळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलगा ठार झाल्यानंतर वनविभागाची बिबट्या असल्याची खात्री झाली. तोपर्यंत वनविभाग बिबट्या नाही, असे ढोल बडवीत होता. (वार्ताहर)