शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike : कारवाईच्या भीतीने नाधवडे येथील एसटी चालकाची आत्महत्या, भुदरगड तालुक्यातील दुसरी दुर्देवी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 19:43 IST

गारगोटी : एसटी कर्मचारी संपाचा तिढा न सुटल्याने नाधवडे ता. भुदरगड येथील एसटी चालकाने कारवाईची भीती व आर्थिक विवंचनेतून ...

गारगोटी : एसटी कर्मचारी संपाचा तिढा न सुटल्याने नाधवडे ता. भुदरगड येथील एसटी चालकाने कारवाईची भीती व आर्थिक विवंचनेतून राहत्या घरी तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. धनाजी मल्हारी वायदंडे (वय-३९) असे या एसटी चालकाने नाव आहे. या दुर्दैवी घटनेबाबत सर्वत्र हळहळ तर कर्मचाऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मृत धनाजी वायदंडे हे १२ वर्षे चालक म्हणून सेवा बजावीत होते. ते गेली ८ वर्षे गारगोटी आगाराकडे कार्यरत होते. वायदंडे हे इतर कर्मचाऱ्यांबरोबरच संपात सहभागी झाले होते. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती प्रचंड हलाखीची आहे. संप काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना त्यांची ओढाताण होत होती.दरम्यान गेल्या ५ जानेवारी रोजी त्यांना गारगोटी आगारामार्फत शिस्त व आवेदन कार्यपद्धती अंतर्गत कारवाई सुरू करण्याची नोटीस बजावली होती. ही नोटिस आज मंगळवार (ता. ११) रोजी त्यांना मिळाली त्यामुळे ते प्रचंड मानसिक ताणतणावाखाली गेले. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.दरम्यान भुदरगड तालुक्यातील ही दुसरी दुर्दैवी घटना घडल्याने शासनाच्या वेळकाढू धोरणाबद्दल कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वायदंडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी करत शासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या घटनेची नोंद भुदरगड पोलिसात झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात दिल्यानंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरST Strikeएसटी संप