शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उपचार परवडत नसल्याने कोल्हापुरात वडिलांचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 04:29 IST

सीपीआर रुग्णालयात २१ मे रोजी नामदेव भास्कर पलंगावर झोपून होते.

कोल्हापूर : औषधोपचारांचा खर्च परवडत नसल्याने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर ) उपचार घेत असताना चुलत्याच्या मदतीने मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केल्याचे पाच महिन्यानंतर पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी करवीर पोलिसांनी मुलगा संशयित गिरीश नामदेव भास्कर (३२) याला अटक केली. त्याचा चुलता तुकाराम पांडुरंग भास्कर (५३) हा पसार आहे.नामदेव पांडुरंग भास्कर (६३) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, शेतमजूर असलेल्या नामदेव यांच्यावर दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतरही त्यांचा त्रास कमी होत नव्हता. घरची परिस्थिती गरिबीची, त्यातच वारंवार वडिलांच्या औषधोपचारांवर होणाऱ्या खर्चामुळे भास्कर कुटुंबीय हतबल झाले होते.सीपीआर रुग्णालयात २१ मे रोजी नामदेव भास्कर पलंगावर झोपून होते. त्यांना सलाईन लावले होते. यावेळी मुलगा गिरीश व त्याचे चुलते तुकाराम भास्कर दोघेजण सेवेला होते. येथील कर्मचारी, परिचारिकेचे लक्ष नसल्याचे पाहून गिरीशने त्यांच्या हाताचे सलाईन काढून टाकले. तुकाराम यांनी भाऊ नामदेव यांच्या नाकात कापसाचे बोळे घालून रुमालाने गळा दाबून त्यांचा खून केला. शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला होता. शनिवारी (दि. ५) त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्याआधारे तब्बल पाच महिन्यांनी या खुनाला वाचा फुटली.

टॅग्स :Murderखून