शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत घरकुल मिळण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 00:03 IST

नगरपालिकेसमोर उपोषण : आठवडाभरात घरकुले वितरित करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन

इचलकरंजी : येथील जयभीम झोपडपट्टीवासीयांसाठी पुनर्वसन योजनेंतर्गत बांधण्यात आलेली ४४४ घरकुले वितरित करावीत, या मागणीसाठी झोपडपट्टीतील बारा नागरिकांनी सोमवारपासून नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले. या प्रश्नाबाबत नगरपालिकेत नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये मक्तेदाराचा १ कोटी ४ लाखांचा धनादेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, घरकुलांच्या वितरणाबाबत नगरपालिकेकडून वारंवार आश्वासने देऊन ती पाळली जात नाहीत, याच्या निषेधार्थ नागरिकांनी उपोषण सुरूच ठेवले.केंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत जयभीम झोपडपट्टीमधील ७२० लाभार्थ्यांना अपार्टमेंट पद्धतीच्या इमारतीमध्ये घरकुले बांधून देण्याचे काम गेले चार वर्षे सुरू आहे. ही घरकुले तयार असूनही लाभार्थींना घरे मिळत नसल्याबद्दल झोपडपट्टीवासीयांमध्ये संताप आहे. घरकुले ताबडतोब द्यावीत यासाठी झोपडपट्टी- वासीयांकडून गेले सहा महिनेहून अधिक काळ नगरपालिकेकडे वारंवार प्रयत्न केले जात आहेत. मात्र, नगरपालिका प्रशासन त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत. म्हणून सोमवारी झोपडपट्टीतील अकरा नागरिकांनी नगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले.या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा बिरंजे यांच्या कार्यालयात मुख्याधिकारी डॉ. रसाळ, उपनगराध्यक्ष महावीर जैन, नगरसेवक सुनील पाटील, अजित जाधव, विठ्ठल चोपडे, नगर अभियंता बापूसाहेब चौधरी, आदींबरोबर लाभार्थींच्या- वतीने नाना पारडे, सतीश टेकाळे, संजय गवळी, संजय निकाळजे, आदींनी चर्चा केली. चर्चेवेळी नगरपालिका वारंवार आश्वासन देऊन ते पूर्ण करत नसल्याबद्दल शिष्टमंडळातील सदस्यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ व नगर अभियंता चौधरी यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. यावेळी काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र, नंतर परिस्थिती निवळली.तयार असलेल्या घरकुलांना नळ पाणीपुरवठा जोडणी, वीज जोडणी, भुयारी गटार योजनेबरोबर जोडणी, आदी अंतिम टप्प्यातील कामे ताबडतोब करून द्यावीत आणि लाभार्थींना घरकुलांचे वाटप करावे; अन्यथा आता लाभार्थ्यांचा संयम तुटत चालला असून, ते इमारतींचा घुसून ताबा घेतील, असा इशारा या चर्चेमध्ये आंदोलकांनी दिला. यावर मक्तेदारास धनादेश देण्याची त्वरित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले. तसेच घरकुलांच्या अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात येतील, असेही यावेळी सांगण्यात आले. शेवटी या प्रश्नाबाबत शुक्रवारी (२३ सप्टेंबर) मक्तेदाराबरोबर सर्वांची बैठक घेण्याचा आणि २६ सप्टेंबरला लाभार्थींची यादी निश्चित करून घरांना क्रमांक देण्याचे ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)मक्तेदाराच्या दुर्लक्षामुळे घरकुल पडूनकेंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत जयभीम झोपडपट्टीमधील ७२० लाभार्थ्यांना अपार्टमेंट पद्धतीच्या इमारतीमध्ये घरकुले बांधून देण्याचे काम गेले चार वर्षे सुरू आहे. यापैकी १४४ घरकुलांच्या इमारती बांधून पूर्णत्वास आल्या आहेत. मात्र, मक्तेदाराचे बिल दिले नसल्यामुळे त्याने इमारतींची अंतिम कामे केलेली नाहीत.