शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराविरोधात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 18:03 IST

कोल्हापूर : बदलीची धमकी देऊन पिळवणूक करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याच्या मागणीसाठी ‘ महावितरण’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर उपोषण ...

ठळक मुद्देठेकेदाराविरोधात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषणपिळवणूक करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टची मागणी

कोल्हापूर : बदलीची धमकी देऊन पिळवणूक करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याच्या मागणीसाठी ‘महावितरण’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कंपनीकडे ७०० पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी आहेत. यामध्ये पगारातील कमिशन देत नसल्यामुळे ठेकेदार आर. बी. जाधव व प्रवीण इलेक्ट्रिकल्स हे दोन ठेकेदार कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. दर महिन्याच्या पगारातून ९०० ते १००० रुपयांची मागणी केली जात आहे.

पैसे दिले नाही तर बदली करू, अशी धमकी देण्यात येते. संघटनेतील सहा पदाधिकाऱ्याच्या अशा प्रकारे बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आर. बी. जाधव आणि प्रवीण इलेक्ट्रिकल्स या दोन ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा. सप्टेंबर ते डिसेंबरचे थकीत वेतन तत्काळ द्या.

पदाधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करा, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी विजय कांबळे, रणजित पाटील, प्रेमसागर देसाई, सागर निगडे, युवराज सोनार, विक्रांत कवडे, कृष्णात यादव, राहूल माने, अमर लोहार उपस्थित होते.

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर